चिरंजीव प्रसाद,
तुझे उत्तर मीळाले धन्यवाद,तुझ्या बद्दल जे काही मी लिहिले आहे ते मला वाटले ते नव्हे तर जे खरे आहे ते लिहिले आहे
निसंशय तुझी सामाजिक कार्याची तळमळ आणि त्याला मिळालेला एक सहृदय चेहरा हे खरोखर नक्षत्रांचे देणे आहे
तुझ्या गुणांचे केलेले कौतुक हे एक तळ्यात पडलेल्या चांदण्या प्रमाणे आहे ,हे तेज तुझ्या गुणांचे आहे माझ्या शब्दांचे नाही
समाजाचे देणे देण्याची हि निर्मल आणि अंगीभूत तळमळ ,हा एक ईश्वरीय प्रसादाच आहे ,तुझे गुण मोठे की माझे गुण वर्णन मोठे
हा प्रश्न्न विष्णू मोठा की विष्णुसहस्त्रनाम मोठे एवढे सोपे आहे आणि उत्तर तुलाही माहित आहे ,तू जे काही कार्य करतोस त्याचे
मूल्यमापन तू करू शकत नाहीस कारण तू ते काम मनातल्या तळमळीने तू करतोस,पोच पावती साठी नाही पण त्याचे मूल्यमापन करून
योग्य ती पोच पावती देणे हे हि एक सामाजिक कर्तव्यच आहे कमीतकमी आम्हाला तेवढे तरी पार पडू दे.
शशांक रांगणेकर
http://www.google.com/transliterate/Marathi
मराठी TYPING खालील SIGHT वर उपलब्ध आहे.