Friday, February 17, 2012

maitrayan

=0
गुरुजींची आभाळ माया
धीरज
डोंगरे ,ठाणे शहरातला एक शहरातला एक सुशिक्षित नवयुवक ,सुखाने कुठेही नोकरी करून करत जगला असता पण काय करणार ,धीरजला दुर्बुद्धी सुचली आणि शिक्षण क्षेत्रातगेला
तेही कुठे एखाद्या मोठ्या उच्चभ्रू वस्तीतल्या शाळेत अथवा क्लास मध्ये गेला असता तर
धीरजचेच  नव्हे तर  चार पिढ्यांचे भले झाले असते ,कारण आजकाल शिक्षणाचा धंदा तेजीत आहे ,पण तो धंदा म्हणून केला तर ,व्रत म्हणून स्वीकारले तर परिणाम "धीरज डोंगरे"
अरेरे काय् हे  आपल्याच पायावर डोंगराएवढा धोंडा पाडून घेणारा हा धीरज दगडच असावा खरे आहे दगडच आहे तो मित्रानो साधासुधा नव्हे मैलाचा दगड .अहिक सुखाचे मार्ग शोधता खऱ्या सुखाचे मार्ग चोखाळणारा एक देवव्रत ,आदिवासी इलाख्यात जाऊन तिथल्या  मुलांना शिकवणारा ,माणूस बनवणारा एक देव्व्रती शिक्षक .धीरज शहापूरपासून कित्येक मैलांवर असलेल्या "बेलवली"नावाच्या गावात प्राथमिक शाळेत शिकवतो ,आदिवासी पाड्यात चालवल्या गेलेल्या शाळेत आणि शासनाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या शाळेत किती तफावत असते हे वेगळे सांगायची  जरूरच नाही ,पण सत्यातल्या शाळा शासकीय जाहिरातीतातल्याच नव्हे तर त्याहूनही चांगल्या बनवण्याचा चंगच जणू त्याने बांधला आहे ,ग्रामीण भागात शाळा शिकवण्याला शाळा हाकणे असाही एक समानार्थी शब्द वापरला जातो सरकारी शाळांना चराऊ कुरण समजणारे काही पुण्यवंत शिकवण्याचा जोड धंदा करत करत ,आर्दश शिक्षक म्हणून प्रमाण पत्रके मिळवतात आणि बाकी आयुष्य त्यावर मिळणाऱ्या लाभांवर सुखनैव घालवतात.पण धीरज कुठल्या मातीचा बनला आहे परमेश्वरच जाणे,हा डोंगरा एवढा माणूस अक्षरशः माणसे घडवतोय , सर्व सामान्य मुलांना मिळणाऱ्या प्राथमिक सोईपासुनही वंचित असलेल्या आदिवासि मुलाना माणसात आणतोय , शिक्षणाचे महत्व काय आहे हे तर शिकवतो आहेच पण त्याहून जिकीरीचे काम म्हणजे त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाचे महत्वही पटवतो आहे ,आणि एवढे करूनही त्याचे वेतन एकाच मिळत असावे हाची मला खात्री आहे ते वेळेवर मिळते कि नाही  ह्याची मात्र खात्री नाही. धीरजच्या शब्दात सांगायचे झाले तर त्याचे विद्यार्थी कित्येक पटीने ती परत फेड करतात त्यांचा होणारा उत्कर्ष त्यांनी त्याच्यवर टाकलेला एक विश्वास आणि त्यांचा खडतर आयुष्यात धीरज मुळे उमटणारी "एखाधीच का होईना" स्मित रेषा, ह्या परताव्यावरती मला आभाळा एवढे सुख मिळते ..सुखाची तुम्हाम्हला कळणारी हि एक वेगळीच परिभाषा ,पण ती कळणारी एक संस्था ठाण्यात ठाण मांडून उभी आहे ,कित्येक सेवाभावी आणि पर्यटन प्रेमी युवकांची एक संस्था "दुर्ग सखा"दर्या डोंगरात फिरणारी आणि" मानवते एक एक पाऊल टाकणारी एक संस्था ,धीरजच्या आठवणीला पुण्यस्मरण म्हणावसे वाटते जिवंत व्यक्तीच्या स्मरणाला पुण्य शब्दाचे अमरत्व प्राप्त तेव्हाच होते जेव्हा ओठांवर शब्द येतात ,गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर ,गुरुर साक्षात परब्रम्ह तस्म्ये गुरवे नमः '
मास्तरला गुरुपद प्राप्त करून देण्याला माझ्या ह्या मित्राला माझे सादर प्रणाम
माझ्या मैत्रायाणातला हा  एक  गुरु चारित्री अद्ध्याय                 
शशांक रांगणेकर

Thursday, February 16, 2012

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे
कोण नसशी तू माझा हे तुला न उमगायचे
मी होता रणीचा पार्थ तू सांगशील रे गीता
विसर बंध नात्याचे लढ अन्यायाशी पुरता
मोहरता फुले मोहाची स्पर्शे गळतील सारी
आनंद अस्पर्षाचा हि तुझीच किमया न्यारी
सूरदास अंध मी होता तू होशी माझी काठी
जग शत्रू होता सारे तू एकालाच मम पाठी
द्वैतातून  अद्वैताचे रेखाशीस तू चित्र
मम जन्म जन्मांतरीचा एकालाच तू मैत्र


शशांक रांगणेकर
मुंबई










Monday, February 13, 2012

अमेय घरत... ग्रे आकाशातील शुक्रतारा!




शब्दांच्या पलीकडले काय असत?... बरेच काही! त्या सर्व भाव-भावनांना एकत्र आणून शब्दात आणि तेही बहुभाषिक शब्दात गुंफणे आणि जाहिरातीसाठी त्याचा परिणामकारक उपयोग करणे हे फक्त त्यालाच जमते जो मनापासून शब्दांवर आणि माणसांवरही प्रेम करतो.

परमेश्वर हा लहरी चित्रकार असावा म्हणून कधी कधी तो अमेय सारखी चित्र मन लाऊन काढतो अन्यथा माझ्यासारख व्यंगचित्रे काढणे हा त्याचा आवडता छंद. सूर्य आणि चंद्र कधी एकत्र येत नाही म्हणतात. एक उगवतो तेव्हा दुसरा मावळतो. पण अमेयाच्या बाबतीत परमेश्वराने हे हि डावलायचे ठरवलेले दिसत. आड म्हणून तर त्याच्या डोळ्यात दिसते चांदणे आणि चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचा सूर्य. जाहिरातचा धंदा तेजीत असल्याने कदाचित परमेश्वराने त्यात उतरायचे ठरवून आपले मास्टर पिसेस पृथ्वीवर पाठवाचे म्हणून अमेयला पाठवले असावे. पण अमेय म्हणजे नुसतीच जाहिरात नव्हे तर शत प्रतिशत सत्यही. भाषेवरचे त्याचे प्रेम हे एक व्रत आहे. त्यासाठी साहित्याच्या कित्येक प्रांतात त्यांनी शिलेदारी केली आहे. कविता, एकांकिका, जिंगल्स, कथा, लेख अशा अनेक प्रकारांवर आपली अमेय मुद्रा त्यांनी उमटवली आहे.

कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथिल कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या "नातवांच्या कविता" या कार्यक्रमात सहा नातवांपैकी एक नातू म्हणून त्याने स्वतःच्या कविता सादर केल्या. अभिनय हे ह्याचे दुसरे वेड. देवेंद्र पेम सारख्या सुप्रसिद्ध रंगाकार्मिंकडे ह्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. भविष्यात एक स्वनिल डोळ्यांचा आणि खुबसुरत चेहऱ्याचा अभिनेता मराठी रंगभूमीवर अथवा टीव्हीवर दिसेल. फोटोग्राफी हा ही त्याचा आवडता छंद. जाहिरातीच्या चंदेरी दुनयेत राहूनही हा युवक जमिनीवर पाय घट्ट रोऊन उभा आहे. 'माणूस' हा ह्याचा आवडता विषय. "विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा." माणसांच्या संगतीत राहून त्यांचे आगळेवेगळेपण हा शोधतो आहे.

आत्मा हे परमात्म्याचे रूप आहे हे ह्याला तरुण वयातही कळले आणि त्याची अनभूती अध्यात्म्याच्या वाटेवर ह्याला येत असते. अध्यात्मिक अनुभूतीला वयाचे बंधन नसते हेच खरे!

अमेय, तुझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर "चालण्याची दिशा बदलताच डावे उजवे आपोआप बदलते आणि डोईवर केवळ 'ग्रे' आकाश उरते!"

खर आहे, पण माझ्यासाठी त्या आकाशात एक तेजस्वी शुक्रताराही लुकलुकतो आहे... अमेय!





- शशांक रांगणेकर

------------------------------------------------------------------------------------------

Sunday, February 12, 2012

सुरज उतेकर

..

एका राजाची गोष्ट सांगतात कि त्याला काय त्रास होतोय तेच कळेना ,औषध लागू पडेना,काहीही रुचेना ,सतत अस्वस्थ वाटत राहायचे ,राजाच तो सर्व वैद्य आले ,हकीम आले अंगारे धुपारे झाले ,पण कुठल्याही उपचाराने उतारच पडेना नवस सायासही झाले नाना प्रकारचे औशोधोपचार झाले देवानाही वेठीला धरले गेले पण तेही सगळे सार्वजनिक सुट्टीवर गेलेले राजाला काय होतंय तेच काळात नव्हतं ,चेहऱ्यावरचे हसू कायमचे लोपले होत ,




एक कुठूनसा साधू तिथे आला ,त्यांनी मात्र एक सोपा उपाय सांगितला ,"राजा तुझ्या रोगावर एकाच उपाय,तो म्हणजे सुखी माणसाचा सदरा ,तो फक्त तीन दिवस घाल कायमचा सुखी होशील ,,पण तो खरोखरीच्या सुखी माणसाचा सदरा पाहिजे ,नाही तुझ्या आणि देणारयाच्या दुक्खात भर पडेल असे सांगून साधू पावला

मग काय सोप्पा उपाय सापडल्याचे वाटून सर्वत्र आनंदी अनाद झाला ,सुखी माणसाचा सदरा घातला कि त्यांचा राजा आणि त्या बरोबर प्रजाही सुखी होणार होती ,युद्ध पातळीवर सुखी माणसाच्या सदरयाची शोधाशोध सुरु झाली ,आज जर ती झाली असती तर राजाला सुखी माणसाचा सदरा मिळाला असता आणि राजा सुखी झाला असता ,,त्यावेळेच्या सुखी असलेल्या माणसाकडे सदराच नव्हता आजच्या एका माणसाकडे मात्र सदरा असूनही तो सुखी आहे आणि नसूनही तो दुख्ही झाला नसता,ह्याची मला खात्री आहे ,राजाला सुखी माणसाचा नाव मी दिले असते आणि पत्ताही सांगितला असता ,सांगितले असते कि अम्बिवालीच्या माझ्या मित्राकडे "सुरज उतेकर"कडे जा तिथे तुला सुखी माणसाचा सदरा मिळेल .


सुरज उतेकर माझा छोटा मित्र छोटा म्हणायचे कारण एकच त्याचे वय, माझ्यापेक्षा कित्येक दशकांनी नंतर   जन्माला आलेला हा माणूस साहित्याची जाण  जन्माला      येतानाच बरोबर घेऊन  आलाय कि काय कळत नाही,  मला तर वाटते हि पूर्व जन्माची कमाई असावी , नाहीतर वयाचे आणि त्याच्या साहित्त्यिक अनुभूतीचे गणितच  जमत नाही.
हा मुलगा काय करत नाही ,अत्यंत प्रतिकूल परीस्तीतीत शिकतोय ,नोकरी ,करतोय ,लिहितोय कविता करतोय आणि साहित्याची नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमटत नाही.


करताना महाराष्ट्रातले डोंगर पालथे घालतोय .आणि हे सर्व करताना क्लेशांची पुसटशी रेषाही त्याच्या चेहऱ्यावर उमट कवी मनाच्या ह्या मुलाला देवी शारदेने मात्र मुक्त हस्ताने शब्द संपत्तिचे वरदान दिले आहे

तरला भावनांना शब्द कोशात कसे बांधायचे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरजची कविता

सुख दुखः हे जणू शब्दरूप घेऊन ह्याच्या कवितेत अलगद उतरतात आणि भाव भावनाची महिरप वाचकाह्याच्याच शब्दात ह्याला दाखवावे लागेल त्याचेच शब्द उसने घेऊन कारण माझ्या दुबळ्या आणि फाटक्या झोळीत ते शब्द नाहीत.

त्याशब्दांशी खेळण्याचा

छंद आगळा जडलाय....

तेव्हापासून दुःखाशी

सूर चांगला जुळलाय..


Saturday, February 11, 2012

अश्विन जोग


योग(जोग)मायेचे एक ईश्वरदत्त अल्हाद्कारी मानवी स्वरूप "अश्विन जोग

बलवान पौरुष्याचे एक अपौरुषेय सांकेतिक रूप म्हणजे अश्व (घोडा)आणि काही अश्व कायम जिंकणारे असतात,आयुष्याच्या कोणत्याही शर्यतीत हे अश्व विन ठरतात ,,सांगली शहरातला एक प्रतिभावान युवक प्रज्ञे बरोबर मर्दानी  सौंदर्याचे वरदान मिळालेला एक युवा उद्योजक ,कला आणि साहित्याच्या क्षेत्रातही तेवढ्याच लीलये वावरतो .

वास्तू निर्मितीच्या  अभियांत्रिकी पदवी धारण करणाऱ्या ह्या युवकाला नुसते माती विटाच्या  बांधकामाचीच माहिती असे नाही तर लाकडांची घर कशी बांधावीत ह्याचे मार्गदर्शन आपल्या परदेशस्थ उपभोक्त्यांना timber homes and software development च्या माध्यमातून करत असतो ,यशाची अनेक शिखरे गाठता गाठता समाज सेवेचे भानही शाबूत ठेवतो .

सांगली शहरा वरती मनापासून प्रेम करणारा हा युवक अश्विनी कुमार सारखे रुपच नाही तर भावही सांभाळून आहे ,अगदी अल्प मोलात सांगली शहरवासियांना  ताज्या फळांचे रस आपल्या रसपान केंद्रात पुरवतो .

निकोप मनाला निकोप शरीराची जोड हि अत्यावश्यक आहे ह्याचे भान ह्या तरुणाला पुरेपूर आहे ,सभ्य माणसांचा खेळ म्हणून समाजाला जाणारा क्रिकेट चा खेळ न चुकता खेळून हा युवक फक्त आपल्याच मनाची आणि शरीराची मशागत करत नाही तर समाजातल्या इतर युवकांची fफळी बांधून सुधृढ युवा वर्गाचे नेतृत्व अनेक पातळीवर करतो आहे .

मित्रांच्या मांदियाळीत रमणारे उमद्या आनंद यात्री आश्विन चे व्यक्तिमत्व त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आपला एक सुखद ठसा उमटवते ,,

जगाने मला काय द्यायला पाहिजे ह्यापेक्षा मी जगाला काय देऊ शकतो ह्याचा सतत विचार करणारा अश्विन आपल्या कृतज्ञतेची पावती चेहऱ्यावर देत असतो ,एका आनंद यात्र्याचे हे रूप नक्कीच लोभसवाणे आहे.

 आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची साधना अनेक माध्यमातून होते ,योग साधना हे त्याचे एक प्रत्याकारी रूप ,साध्य एक साधना अनेक ,नश्वर शरीराला ईश्वरदत्त प्राणवायूचा पुरवठा  करून देण्याची किमया आरोबिक योग च्या द्वारे त्यांनी साधली आहे आणि त्याचे प्रशिक्षण तो आपल्या आरोबोक सेंटर मध्ये देतो ,  सांगलीकरांची काळजी अगदी "योग क्षेम वहाम्यहम "भावनेने घेणारा सांगलीकर फक्त सांगलीतच नव्हे तर इतरत्रही जन प्रिय आहे.

शशांक रांगणेकर













,

Thursday, February 9, 2012

प्रिय जनहो ,


माझ्या मित्रानो आपल्या अजयचा मराठी चित्रपट १० तारखेला प्रदर्शित होतोय ,अजय नाईक एक साधा सरळ स्वभावाचा मराठी मुलगा ,चित्रपट निर्मितीत उतरला आहे, आपल्या मराठी मुलांना एकत्र करून एक स्वच्छ साधा आणि तुम्हाला आवडेल असा मराठी चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आला आहे ,अजयच्या चेहरया वरचे सोज्वळ आणि प्रासादिक भाव हेच त्या चित्रपटाचे अतरंग ,आणि मराठी मनाला संस्कृतीला शोभतील असे दृश्य रंग ,ह्या साऱ्या रंग संगतीत तुमचा सहभाग हा जीवन रंग ठरणार आहे,सतर्न्गीच्या जाहिरातीतली ती मराठी तरुणाई बघा दृष्ट लागेल असे एक जीवंतपण चेहऱ्यावर बाळगून तुमच्या सक्रीय पाठींब्या कडे पाहतेय ,त्यांना निराश करूनका आपल्या घराचे एक कार्य असल्या सारखे त्यात सहभागी व्हा ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा,

"आम्ही सर्व मराठी आहोत आणि आम्ही एका मराठी मुलाने निर्र्मिलेला चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघू असे आश्वासन त्याला द्या ,तुमच्या पाठिंब्याची त्याला जरूर आहे,

"एक मराठी माणूस म्हणून तुम्हा सर्वाना विनंती करतो कि अजयचा मराठी चित्रपट जो शत प्रतिशत मराठी आहे तो यशस्वी करा "त्याच्या wallavar जाऊन तसा सं