Tuesday, November 21, 2017

• Hindu (हिंदू ब्राह्मण )


जात आणि धर्म ह्या सदराखाली "हिंदू ब्राम्हण@ असे लिहिणे किती स्फोटक आहे ह्याची तुम्हाला  कल्पना आहेच .,पण सार्थ अभिमानाने तसे लिहिणारा एक युवक आढळला ,आपल्या जाती धर्माचा सार्थ अभिमान हा दुर्गुण नव्हे तर दुसऱ्याच्या जाती धर्माबद्दल हिनातेची भावना हा दुर्गुण ,
उपख्यांवरून ब्राम्हणत्व ठरते ते केवळ सामाजिक अथवा राजकीय सोयींसाठी ,पण खरे ब्राम्हणत्व ठरते ते माणूस जेव्हा सती अरुंधतीच्या ब्राम्हणाच्या व्याखेत बसतो तेव्हा ,"याह ब्रम्ह जानाति सहा ब्राह्मणः "हि अरुंधतीची व्याख्या आणि केवळ ह्या व्याख्येत बसणारा विपिन खरा ब्राम्हण आहे आणि त्यामुळेच त्याचा अभिमानही सार्थ आहे.
"एकाच संधी असते आयुष्य जगण्याची "हे ज्याला कळले त्यला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले म्हणायला हरकत नाही ,कारण आयुष्य एकाच मिळते अशी जाण असणारा माणूस भविष्यावर अवलंबून न राहता वर्तमानाच्या सहाय्याने
आयुष्य खर्या अर्थाने संपन्न करत असतो
सामाजिक घटना इतिहास ह्याचे भान ठेवणे फार आवश्यक आहे ज्या जगात आपण राहतो त्या जगाशी आपले देणे घेणे असतेच ,जगात राहून आपल्या घराची मनाची आणि बुद्धीची कवाडे झाकणे हि खरीतर कृताघानता ठरेल ,समाजात घडणाऱ्या साधक बाधक घटना क्रमांची नोंद घेऊन योग्य वेळी त्यावर भाष्य करणे आणि तीही सभ्य भाषेत करणे हा समाज प्रबोधनाचा अविभाज्य भाग आहे ,सामाजिक संकेत स्थळे हि उखाळ्या पाखाळ्या काढण्याची जागा नाही असे ठणकावून सांगणारा विपिन मनापासून भावतो
संवेदना शीलता हे एक मराठी मनाचे आद्य स्वरूप
,मातृभाषेवर प्रेम हि त्याची दुखती राग ,मुंबईत मराठीला आणि मराठी माणसाला जागा नाही अशी सल ठेऊन राहणारी माणसेच एक दिवस संयुक्त महाराष्ट्र घडवतात ,आपल्या मनातली हि सल विपिन सतत दर्शवित असतो आणि तेही अंग्लाभाशेवर प्रभुत्व नाही हि म्हणून नव्हे तर मातृभाषेवर मनापासून प्रेम आहे म्हणून.
तरुण वयातही सामाजिक जाणीवाचे भान ठेवणारा हा युवक खर्या अर्थाने "हिंदू ब्राम्हण"आहे
कारण जगातली सगळ्यात चांगली आणि वाईट गोष्ट एकाच आहे ती म्हणजे माणसाचे मन , आणि ज्याला मनाचे हे ब्रम्ह स्वरूप ज्ञान प्राप्त झाले आहे त्याहून मोठा ब्राम्हण कोणता ,
विपिन च्या ह्या ब्रम्ह स्वरूपाला मैत्रायाणाचे अभिवादन

Monday, June 25, 2012

देव भावाचा भुकेला

देव भावाचा भुकेला
निशब्द देव मराठी कवितेला पडलेले एक भाव गर्भ स्वप्न,मनात आलेल्या भावनांना शब्दांचे रंगरूप देऊन रसिकांच्या मनापर्यंत पोहचविण्याचे काम हे कवीचे काम ,आणि निशब्द हा शत प्रती शत कवी आहे. अतिशय थोडक्या शब्दात जास्तीत जास्त भाव व्यक्त करणे हे उत्तम कवितेचे आदिस्वरूप.निशब्द ह्या कलेत पारंगत आहे.
जीवन चढ उतारांच्या सापशिडी च्या पटावरमुद्रांकित केलेले असते.सुख दुक्ख ,आहेरे नाहीरे ,उन्हा पाउस,जन्म मृत्यू ,अश्या अनेक उलट अर्थी शब्दांची ओळख होताच जाते ,त्यातून पाझरणारे भाव शब्दांच्या जवळपास पोहचतात पण कधीकधी ह्या दोन टोकांच्या मध्ये होणारी घुसमट मात्र निशब्द असते ,आणि देव त्या घुसमटीला अचूक शब्दांच्या पकडीत पकडतात आणि वाचका पर्यंत पोहचवतात ,जळणाऱ्या ज्वालेला शब्दात रंगवता येते पण धुमसणाऱ्या घुसमटीला शब्दांचा टाहो फोडणे फार कठीण आणि देवाच्या कवितेत नेमके तेच सामर्थ्य आहे ,निश्श्ब्द असूनही अतिशय बोलकी अशी हि देवांची बोलकी कविता केशवसुतांच्या "झपूर्झा गडे झपूर्झा"ह्या कवितेशी जवळीक साधणारी वाटते.
आभाळा एवढे दुक्ख दोन ओळीच्या कवितेत मांडण्याचे आणि त्यायोगे अनुचित राजकारणावर दोनच ओळीचे काव्य आसुडा प्रमाणे ओढणारी
त्यांची कविता जेव्हा "चांगले गुण होते पण जातीने गोंधळ केला म्हणते "तेव्हा मंडलआयोग आणि त्यानंतरचे अजूनही धुमसणारे जळीत उभे राहते.
देवांची कविता हि सर्वगामी आहे ,व्यक्ती पासून समष्टी पर्यंत पोहचणारी ,दुक्खाचे पापुद्रेन पापुद्रे सैल करणारी आणि आणि सुखकर तुझा प्रवास विठ्ठला म्हणत आध्यात्य्म्याच्या अबोल मुक्तीला स्पर्श करणारी कविता.
देवांची कविता काम क्रोध मद मोह मत्सर ह्या सर्व मानवी गुण अवगुणाचे चित्रणही फार छान करते.कारण कल्पनेचे पंख लाऊन फिरणाऱ्या ह्या कवीचे पाय मात्र वास्तवाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
देवांची कविता आणि तिचा अर्थ म्हणजे सतत वाहत जाणाऱ्या आणि पात्र बदलणाऱ्या नदीचे चित्रण शब्दात न पकडता येण्या जोगे ,शब्दांच्या कवेत दुक्खला कवलानारी आणि अर्थाच्या रंगात सुखाला रंगवणारी.देवांची कविता ,निशब्द देवाची बोलाकेच नव्हे तर अबोल करणारी हि कविता एकून म्हणावसे वाटते "देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो."सूर्य किरणासारखी स्वच्छ आणि लखलखीत पसरणारी आणि आभाळ माये सारखी बरसणारी देवांची कविता आणि निशब्द देव ह्यांना मैत्रायानाचे सलाम .
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Monday, June 18, 2012

धन्य ते गायनी कळा

धन्य ते गायनी कळा
गायन कलेचे महत्व आणि मानवी आयुष्यातले त्याचे महत्व जाणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीने गायन कलेला पंचम वेद म्हणून संबोधले आहे. समर्थ रामदास सारख्या संताने पण "धन्य ते गायनी कळा"म्हणून गायन कलेचा गौरव केला आहे.
मराठवाडा आणि देवगिरी म्हणजे संतांचे माहेरघर.जवळच्या पैठण ची ख्याती दक्षिण काशी म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. वेरूळची लेणी घृ ्णेश्वाराचे मंदिर ,देवगिरीचा किल्ला ,हि महाराष्ट्राची आभूषणे संत संस्कृतीचा वारसा घेऊन औरंगाबाद ,पैठण ,हि शहरे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला खुलवतात आहेत.
आज औरंगाबाद च्या एका युवा कलाकाराचा जन्मदिवस आहे ,त्या सुरेल आणि सुरेख कलाकाराला मैत्रायनाच्या हार्दिक शुभेच्छा .
प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांची "स्वर विहार "संस्था माहित नसलेला माणूस शहरात नसावा.आणि नितीनच्या मराठी भावगीतांवर आशिक झाला नाही असा युवक औरंगाबादेत नसावा असलातर कदाचित बहिरा तरी असावा.
नितीतीन सरकटे हे फक्त तरुणाईचेच आवडते नाव नाही तर बुजुर्गांचेही लाडके नाव आहे ,वेरूळ महोत्सवाचे रंग
नितीनच्या दमदार आणि ओजस्वी अवजावाचून रंगतच नाही. नीतींची पंढरीची वारी रंगवणारे गाणे चालू होते तेव्हा वाटते कि तो विठूराया पंढरी सोडून पैठणच्या मार्गावर येतोय त्याच्या वारीला भेटायला ,, आणि नितीन स्वरासाधानेत येवढा मग्न असतो कि त्या बापड्या पांडुरंगाला द्यायला नितीन कडे विटाही नसते. नितीन गातो ते मजा म्हणून नव्हे तर उपासना म्हणून.पितृतुल्य वडील भावाच्या उपासनेचे दृश्यस्वरूप म्हणजे पुत्ररूप नितीनचे सुगम गाणे.
नितीन गाणे सुगम संगीत असते सुगम म्हणजे सगळ्यांना आवडणारे आणि समजणारे.
कलाकार हे परमेश्वराचे दूत असतात ,त्याच्या ब्राम्हस्वरूपाचे गायन ते करतात फक्त मार्ग वेगवेगळे असतात .
ज्या मार्गाने भावाच्या मार्गदर्शना खाली नीतीत गातो ते सर्वांचे गाणे आहे भाषा प्रांत आणि भावनांना ओलांडून जाणारे गाणे.
ह्या गाण्याला कसलेही बंध नाहीत ते मुक्त आहे म्हणूनच सुगम आहे ,सुगम संगीताच्या ह्या देवगिरी बादशाहाला मैत्रायानाचा सलाम.
शशांक रांगणेकर .मुंबई. 

Wednesday, June 13, 2012

दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या


दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या
हे चौगुले आणि आम्ही गणपुले सक्खे शेजारी
हो हो अगदी सक्खे, चाळीस वर्षे आमच्या शेजारी राहतात अगदी प्रेमाने राहतो आम्ही दोन घरात काय ती एक भिंत नाहीतर दोनीही घरे एकाच .अगदी खर नाहीतर एकाच घर
ह्याची पोर माझ्याघरी कायम चरतात घर एकाच वाटेल .नाही तर काय  इति चौगुले
चाळीस वर्षे माझा धर्म बुडतोय माझी पोरे बाटाताहेत धाकटा अभक्ष भक्षण करतो इति गणपुले
तरीही आम्ही सक्खे शेजारी. दोन समांतर रेषा कायम बरोबर धावणाऱ्या


आज प्राध्यापक म्हलाशांसारख्या ऋषी तुल्य विद्वानाचा सत्कार करताना ह्या महाविद्य्लायाचा प्राचार्य आणि त्यंचा जुना सहकारी म्हणून आनंद होतोय इति प्राचार्य बनसोडे
आज माझे सहकारी आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बनसोडे ह्यांच्या हातून माझा सत्कार होतोय हाच मला मनापासून आनंद होतोय प्राचार्य बनसोडे आणि मी ३५ वर्षाचे सहकारी  आहोत  इति प्राध्यापक .मालशे.
भटाला हा शेवटचा नारळ आता सुटीन ह्याच्या बामणी जाचातून ..बनसोडे
सरकारी तट्टू हे लायकी तरी आहेका ह्याची माझ्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष व्हायचे पण करणार काय जाता जात नाही ती जात भट पडलोना मी. म्हणून हा प्राचार्य आणि मी मात्र प्राध्यापक .इति प्राध्यापक मालशे
३५ वर्षाचे सहकारी आम्ही दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या

 अय्या कुंदा तू इति सौ मंदा मळवट  अय्या मंदा तू इति कुमारी कुंदा भागवत

अय्या तुम्ही ओळखता एकमेकीना तिसरी ओळखायला काय झाल आम्ही
जिवलग मैत्रिणी लहान पण पासूनच्या दोघीही एकदम
 अगदी लहानपणी होतीस तशीच आहेस तू स्मार्ट,स्लिम,आणि फिट( नसायला काय झाल पोर बाळ आणि दरोज बदलता नवरा , माझ्याही नवऱ्यावर डोळा होता मेलीचा ) इति मंदा
तू हि अजूनही तशीच साधी सोज्वळ माझ्या लहान पणा पासूनची गोड मैत्रीण (भटणी सारख्या झिपऱ्या
कुरामुर्याच्या पोत्या सारखे शरीर ,शी रौं टन)नवरा मात्र बरा गटावालाय नशीब नाही तर काय कुन्दा 
मैत्रिणी म्हणे जिवाभावाच्या ,तोंडावर प्रेम दाखवले तरी मनातले वैरभाव लपत नाही कैदाशिणीच्या जिवलग मैत्रिणी म्हणे तिसरी दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या.
 आज माझे मित्र आणि महाराष्ट्रातालेच नव्हे तर आपल्या देशातले नामवंत उद्योगपती श्री गुलाबराव भुसे ह्यांची आपल्या ला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही ,उद्योग जगतात त्यांना कोण ओळखत नाही (सगळ्यांचे पैसे बुडवणारा एक नंबरचा लुच्चा आणि लबाड )इति उद्योगपती मेहेरचंद खुशालचंद
मेहेरचंद जींच्या हातून हा सन्मान मिळावा हे मी माझे भाग्याच समजतो .(सरकारी दरबारी xxx गिरी कशी करावी हे ह्याच्या कडून शिकावे ,उद्योग पती म्हणे ,ह्याच्या ह्या वयातही चालेल्या उद्य्गाने बायको आणि मुले कंटाळली आहेत )इति उद्योगपती भुसे
दोघेही चोर एक ठग तर दुसरा पेंढारी ..तिसरे उद्योजक दोन समांतर रेषा कायम बरो बर धावणाऱ्या.















Saturday, June 9, 2012

देवाच्या डायरीतले एक पान

देवाच्या डायरीतले एक पान
निशब्द देवांवर मी चार ओळी लिहून फेस बुक्वर टाकल्या आणि एक निरोप आला कि त्याची" मी माझ्या बापाला रडताना पहिले आहे "हि कविता नक्कीच वाचावी आणि तो निरोप होता एका कवी नाव "सुधीर मुलीक "नावाच्या व्यक्ती कढून,डोळे बंद केले आणि सुधीरचे चित्र डोळ्यासमोर आणायाचा प्रयत्न केला , चित्र आले एका आकाशाचे ,मनापासून मित्रांवर आपल्या आभाळ मायेची सावली धरणाऱ्या एका आकाशाची.एका कवीने आपल्या दुसऱ्या कवी मित्राची आठवण करून देणे हि त्याच्या मोठ्या मनाची अलिखित पावतीच .माणसाच्या मोठेपणाची मोजमाप हि अशीच दिसून येतात.
सुधीरचे प्रोफाईल बघता वाटले कि कोण आहे हा काविकी चित्रकार ,शब्दाचे कुंचले आणि भावनाचे रंग ह्यांचा करामतीवर किती रंगीली बनतात ह्याची काव्य चित्र .
गझल ह्याचा प्राण .गझलेमध्ये दुखाची वेदना शब्दांकित झाली तरच ती गझल.पण ती होतानाही कुठलेही वैश्य भाव मात्र दिसताकामा नयेत हा एक साहित्त्यिक रूढ संकेत.आणि शब्द भाव आणि संकेतांच्या प्रसव वेदानाने जन्माला घातलेली गझल प्रभावी आणि वाचनीय असते. नाही तर नुसती यमके जुळवून गझल होत नाही.तिच्या जन्माच्या वेळेच्या प्रसव वेदनांचे चित्रण शब्दांकित झाले नाही तर ते होते एक बेरंगी चित्र वेदनांचे दुक्खाचे रंग नसलेले.
कुंतीने श्रीकृष्णा दुक्ख मागितले होते आणि दुक्खातच तुझी आठवण येते म्हणून तुझी सतत आठवण यावी म्हणून मला दुक्ख दे अशी तिची आळवणी होती.सुखात माणूस उततो मातातो पण दुक्खात परमेश्वराची आठवण ठेवतो ,आणि दुखाची विराणी सांगणारी गझल माणसाला परमेश्वराच्या समोर विनम्र करते .
दुक्ख कसलेही असो परीघावाराच्या अंतराची किंवा पोटात उडालेल्या वणव्याची सल मात्र ,तेवढीच बोचरी कारण ती सल जाणवून देतो एक गझलकार सुधीर ,र्याच्या शब्दांना फुटलेली दुक्खाच्या निवडुंगाची फुले जास्त बोचरी असतात.
इष्काच्या बाजारातले तू त्याची नव्हतीस कधी आणि तो तुझाही नव्हता कधी असे सांगणारे सत्य ह्याच्या शब्दाने केवळ उघडेच नाही तर चक्क नागडे होते.प्रभावी शब्दांचे हे वस्त्रहरण महाभारत सारखे आठवणीत राहते.
सुधीरची कविता हि पूर्ण कविता आहे कारण ती आमची सर्वांची आहे ,आमच्या दुक्खावर फुंकर घालणारी ,,आमचे दंभ दाखवणारी आणि आमच्या इच्छांना पालवी फोडणारी.
सर्वार्थाने आमचा कोण असतो जो फक्त देतो तो देव,आणि जेव्हा खुदा देतो तेव्हा छप्पर फाडके देतो.सुधीरचे देणे असच आहे फक्त घेणार्याची झोळी मात्र दुबळी असता कामा नये.
देवाच्या डायरीतल्या ह्या पानाला मैत्रायानाच्या शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

Friday, June 8, 2012

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतातआणि हा देवाचा आशीर्वाद जर निशब्द येत असेल त्याचे रूप गंध फारच मनोहारी असतात.काही कविता भाषेला संपन्न करतात आणि कवी जनमानसाला.मराठी कविता संपली म्हणणाऱ्या टीकाकारांना मिळालेले एक निशब्द उत्तर जे देवा घरून आले आहे.मराठी कविता अमर आहे अक्षर आहे सांगणारे हे उत्तर.
मराठी कविता हि मराठी माणसाची समाजाची एक हृदयस्थ जिवंत जाणीव,"राकट देश कणखर देश दगडांच्या देशा"म्हंटल्या गेलेल्या देशाचे रूप दिसते हळुवार कवितेत आणि र्या रुपाला रंग देतात कवी.
एक असाच शब्दांना भावांचा रंग देणारा एक कवी निशब्द देव.
अतिशय नाजूक तरीही अत्यंत प्रभावी शब्दात सुख दुक्खाचे मोहर फुलवणारी यांची कविता हि मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे.
 
देवांची कविता जशी नाजूक आहे हळुवार आहे तशीच मानवी अपप्रवृत्तींवर कोरडे ओढणारी हि
आहे.
"गोष्टी नको नकोत्या सांगून लोक गेले ..हि अशीच एक सुन्न करणारी कविता अतिशय थोड्या शब्दात कवीची सल वेदना प्रकट करणारी त्याची कविता थेट वाचकांच्या हृद्याच भिडते.
मानवी जीवन सुख दुक्खांचा एक क्यालीडोस्कोप प्रत्येक धक्क्य बरोबर काचांच्या आकृत्या बदलत असतात.सुख कधी कुठे संपते आणि दुखाची झळ लागत जाते ते काळातही नाही.सुख्दुखाच्या ह्या लहरींवर मानवी जीवन तरंगत असते आणि नेमकी तीच अस्थिरता ह्या कवीच्या कवितेत डोकावून जाते.
ह्या देवांची मला भावलेली एक कविता "म्हणून तू रडली होतीस न आई ,"हा लेख लिहिता लिहिता मला ती वाचायला मिळाली ,लहान मुलाच्या मनातले निरागस दुख्हाचे कढ,देवा रे देवा किरी भन्नाट लिहितो माणूस अगदी फोडां प्रमाणे ठसठसणाऱ्या अगतिकतेकी नेमकी पण निरागस सल.
दाखवतो आणि तरीही तू मला पाहिजे ते सर्व दिल होतस म्हणत समाधानाची साय हि पसरवतो .दुक्खाला शब्दांची झबली चढवणारी ह्याची कविता मातृत्वाचे मंगल स्तोत्र गाते. .आजची श्यामची आई आणि तिचा श्याम आज ह्याच्या कवितेत दिसतो.
ह्याची कविता वाचकालाच निशब्द करते ह्याच्यावर चार शब्द लिहिण्याची ताकतही माझ्या शब्दात नाही हा माझ्झा लेख म्हणजे सूर्याला ओवाळणारी पणतीची ज्योत.निशब्द तुझ्या शब्द प्रभुत्वाची हि एक मैत्रायानाची प्रेमळ पावती समज आणि मान्य करून घे.
शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२

Thursday, June 7, 2012

चिरंजीव प्राजक्त


चिरंजीव प्राजक्त

वाढ़ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,मराठी कविता तुझी सदैव ऋणी राहिल. तुझी कविता एकणे हा एक रोमान्चकारी अनुभव ,कधी तुझे शब्द आनन्दाचे सोनेरी स्वप्न घेउन येतात तर कधि दुक्खचा वैशाख वणावा,कधि इश्काची गुलाबी स्वपने तर कधि विरहाची काळ रात्र .तु शत प्रतिशत कवि आहेस . भाव आणि शब्द तुज़े कायमचे गुलाम पाहिजे तेव्हा पाहिजे त्या रुपात भावात तुझ्या साथीला ते तयार.
मानवी मनातले कुठ्लेहि भाव तुला अनोळाखी नाहीत ,तुज़े भाव विश्व तु निर्मितोस आमच्या हातला धरुन सफरिला नेतोस ,शब्द आणि भाव इतके प्रभावी कि सोडु म्हणता तरी हात सुटत् नहि. .
पुराण कथेताल्या विश्मित्रानी स्वताहाचे एक जग निर्माण केले होते तु हि तसेच जग तुज्या रसिक श्रोत्यां साठी निर्माण करतोस आत जायचा रस्ता कळतो पण बाहेर पडायाचा रस्ता मात्र दिसत नहि,तुझ्या महिअफिलिच्या बाहेर पड तो तो तुज्या शब्दांच्या रमल खुणाची शाल पांघ रुनच..प्रेक्षकाला बंदिस्त करणारी तुझी कविता . एक इष्टपत्तिच बाँधणरि तरिही मुक्त करणारी,,,तरुणाइ शब्दावर डोलते आणि बुजुर्गायत विचार करते,अशि बहुआयामी कविता ,शब्दात बंदिस्त न होणारी.तुझ्या काव्यापुढे हे शब्द केवळ l अपुरेच. शब्द सम्पत्तिच्या ह्या बेताज बादशाहला द्ययाचे तरी काय
शुभेच्छा आणि शुभेछां शिवाय ,.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२