Wednesday, June 6, 2012

शशांक शिरीष केतकर

 
आज आकाशात बरेचसे ढग दाटून आले आहेत ,तृषार्त चातका प्रमाणे सर्व जण पावसाची वाट पाहताहेत ,फेस बुक हि आमची खिडकी झाली आहे ,ह्या खिडकी तून बाहेरचे वारे येतात आणि जगात काय चालले आहे आहे ह्याची जाणीव करून देतात. म्हंटला बघूया फेस बुक वरचा पाऊस काय म्हणतोय .सर्फ करता करता एका कलाकाराचे प्रोफाईल नजरेत पडले ,शशांक केतकर ह्याचे आणि नावात साम्य असल्याने ते पूर्णपणे पाहण्याचा मोहही आवरला नाही.

एक अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात गुंफलेले चारच ओळींची कविता होती,"बोलले मेघ हे सारे अन बोलले थेंब रे ...........
अतिशय तरल शब्दात पावसाच्या चाहुलीची भावपूर्ण कुजबुज सांगणारी हि कविता मनापासून भावली.
प्रोफाईल ची सफर चालूच होती ,आणि तिळा उघड म्हणताच उघडणारी अलिबाबा ची गुहा उघडली.
केवळ चकचकीत चेहरा असलेला हा रंगकर्मी नाही तर सामाजिक संवेदानाचे भान ठेवणारा ,मनात कविता जपणारा आणि फुलवणारा एक संवादशील कलाकार आहे.
चेहऱ्यावर चमकणारे बुद्धिमत्तेचे तेज आणि डोळ्यात ओथंबणारे माणुसकीचे मेघ.आणि प्रसन्ना व्यक्तिमत्वाचे गुलाबी वलय. छोट्या पडद्यावरचे एक मोठे उदयोन्मुख आगमन.
मी सहसा मालिका बघत नाही कारण त्यात दिसणाऱ्या व्यक्ती मला अनोळखी वाटतात ,चांगुलपणा आणि दुष्टपणा ह्याची सीमा गाठणारी व्यक्तिमत्व अजूनतरी परमेश्वर कृपेने माझ्या भेटीला आलेली नाहीत. पण शशांक काम करत असेलेली सिरीयल थोडा वेळका होईना त्याच्या उपस्तिथी मुले सुसह्य वाटते. एक संयत अभिनयाचे दर्शन होते.

शशांक ने अभिमानाने आपण जोपासलेल्या झाडाच्या आंब्याचे फोटो भिंतीवर टाकले आहेत.मातीशी नाते सांगणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सिरीयल च्या कचकडी जगात राहूनही स्वतःच्या श्रमाने मोहरणारे अनोखे रूप.

ज्ञान कोशकार केतकर महाराष्ट्रातले एक धीमंत व्यक्तिमत्व ,शशांक हि त्या बुद्धीचा वारसा ठेऊनच आहे.सेलिब्रेटी आणि त्यांचे समाजकार्य ह्यावरचे त्याचे भाष्य त्याच्या निरक्षण क्षमता आणि अचूक भाष्य हे ह्याची ठळक ओळख देतात.
शशांक एक लोकप्रिय कलाकार आहे ,पण तरीही त्याच्या कला गुणांना पुरेसा वाव मिळत नाही आहे हि खंत मनात कुठेतरी सालात राहते ,कदाचित त्याचे व्यक्तिमत्व पेलवेल अश्या भूमिका सिरीयल निर्मात्यांकडे नसाव्यात का.अभिनय उच्चारण आणि प्रसन्ना व्यक्तिमत्व लाभलेल्या ह्या गुणी कलाकार ह्या छोट्या पडद्याला पेलवत नाही कि उमगत हेच नाही कळत .
नाही.
शशांकाचे पूर्ण प्रोफाईल मी पहिले आनंद वाटला मराठी कलाक्षेत्राला एक सुसंस्कृत बुद्धिमान लोभस आणि तेजस्वी वाक्तीमात्वा नियती भेट म्हणून देते आहे आणि छोट्या पडद्यावरच्या बड्या बुजुर्गांनी ह्या नावागाताच्या दैवी देणगीचा लाभ घेऊन त्याला आणि ह्या छोट्या पडद्यालाही मोठे बनवावे सर्वार्थाने.
मनात डोकावणारा एक अनाहूत विचार "मी ह्या व्यक्तीला ओळखतही नाही तरीही मला ह्याच्या बद्दल चार शब्द लिहावेसे का वाटले उत्तर आले ते दैवी गुण बुद्धीचे रूपाचे आणि माणुसकीचे त्यांना तू पूर्ण ओळखतोस ना ते ह्याचात दिसले आणि त्यंनी घातलेल्या सादेचा हा प्रतिसाद असावा आणि काय.
शशांक शिरीष केतकर ह्या व्यक्तीलाच नव्हे तर व्यक्तिमत्वाला मैत्रायाणाच्या हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
मुंबई
९८२१४५८६०२

1 comment:

Unknown said...

सगळ्यात आधी मी माझ्या आई बाबांचा रूणी आहे कि त्यांनी मला हा जन्म दिला. ते, माझी धाकटी बहीण, माझे मित्र मंडळी, नातलग, शिक्षक, सहकलाकार, रस्त्यातून जाता-येता भेतलेली प्रत्येक ओळखीची आणि अनोळखी व्यक्ती, प्रत्येक चांगला वाईट अनूभव, या सगळ्याशीवाय मी शून्य आहे.

माझी भाषा, माझे विचार, माझं लिखाण, माझा अभिनय, सामाजीक जाण आणि रोजच वागणं हे सारं यामूळेच घडतयं, आकार घेतयं.

हे माझ्याबद्दल लिहिलेले चार शब्द वाचून खरं सांगायच तर आंगावर काटा आला. जबाबदारीची आणखी जाणीव झाली. तुमच्या व ईतर कुणाच्याही विश्वासाला तडा जाता कामा नये, समाजाचे रूण न विसरता काम करता आल पाहिजे, याची पूर्ण काळजी घेईन मी. एखाद्या अनीष्ट गोष्टी विरूद्ध लढण्याची ताकद म्हणजेच हे शब्द आहेत माझ्यासाठी.

तुमचे असेच आशिर्वाद माझ्या पाठीशी राहतील याची खात्री आहे मला.
शशांक केतकर.