Saturday, February 11, 2012

अश्विन जोग


योग(जोग)मायेचे एक ईश्वरदत्त अल्हाद्कारी मानवी स्वरूप "अश्विन जोग

बलवान पौरुष्याचे एक अपौरुषेय सांकेतिक रूप म्हणजे अश्व (घोडा)आणि काही अश्व कायम जिंकणारे असतात,आयुष्याच्या कोणत्याही शर्यतीत हे अश्व विन ठरतात ,,सांगली शहरातला एक प्रतिभावान युवक प्रज्ञे बरोबर मर्दानी  सौंदर्याचे वरदान मिळालेला एक युवा उद्योजक ,कला आणि साहित्याच्या क्षेत्रातही तेवढ्याच लीलये वावरतो .

वास्तू निर्मितीच्या  अभियांत्रिकी पदवी धारण करणाऱ्या ह्या युवकाला नुसते माती विटाच्या  बांधकामाचीच माहिती असे नाही तर लाकडांची घर कशी बांधावीत ह्याचे मार्गदर्शन आपल्या परदेशस्थ उपभोक्त्यांना timber homes and software development च्या माध्यमातून करत असतो ,यशाची अनेक शिखरे गाठता गाठता समाज सेवेचे भानही शाबूत ठेवतो .

सांगली शहरा वरती मनापासून प्रेम करणारा हा युवक अश्विनी कुमार सारखे रुपच नाही तर भावही सांभाळून आहे ,अगदी अल्प मोलात सांगली शहरवासियांना  ताज्या फळांचे रस आपल्या रसपान केंद्रात पुरवतो .

निकोप मनाला निकोप शरीराची जोड हि अत्यावश्यक आहे ह्याचे भान ह्या तरुणाला पुरेपूर आहे ,सभ्य माणसांचा खेळ म्हणून समाजाला जाणारा क्रिकेट चा खेळ न चुकता खेळून हा युवक फक्त आपल्याच मनाची आणि शरीराची मशागत करत नाही तर समाजातल्या इतर युवकांची fफळी बांधून सुधृढ युवा वर्गाचे नेतृत्व अनेक पातळीवर करतो आहे .

मित्रांच्या मांदियाळीत रमणारे उमद्या आनंद यात्री आश्विन चे व्यक्तिमत्व त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आपला एक सुखद ठसा उमटवते ,,

जगाने मला काय द्यायला पाहिजे ह्यापेक्षा मी जगाला काय देऊ शकतो ह्याचा सतत विचार करणारा अश्विन आपल्या कृतज्ञतेची पावती चेहऱ्यावर देत असतो ,एका आनंद यात्र्याचे हे रूप नक्कीच लोभसवाणे आहे.

 आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाची साधना अनेक माध्यमातून होते ,योग साधना हे त्याचे एक प्रत्याकारी रूप ,साध्य एक साधना अनेक ,नश्वर शरीराला ईश्वरदत्त प्राणवायूचा पुरवठा  करून देण्याची किमया आरोबिक योग च्या द्वारे त्यांनी साधली आहे आणि त्याचे प्रशिक्षण तो आपल्या आरोबोक सेंटर मध्ये देतो ,  सांगलीकरांची काळजी अगदी "योग क्षेम वहाम्यहम "भावनेने घेणारा सांगलीकर फक्त सांगलीतच नव्हे तर इतरत्रही जन प्रिय आहे.

शशांक रांगणेकर













,

No comments: