शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

साहिल राज शिर्के

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन तुकोबा सांगून 
गेले आहे 
मनातल सगळं विचारांचं गार्बेज काढून टाका क्लीन करा आणि पुन्हा एकदा फ्रेश व्हा बघा किती बरं वाटेल तुम्हाला फ्रेश ब्रीद करून तुम्ही एकदम चील व्हाल मग सफाई करायची कशी घरी येणाऱ्या मेड ला सांगून करायची का ? इथं नेहमीच नीट करत नाही मग करायचं काय तुमच्यासाठी एक ब्रूम घेऊन आलाय तुमचा एक बडी साहिल त्याने तुमच्यासाठी बोर्ड गेम बनवला आहे आणि त्या गेमचं नाव आहे मोक्षा आता तसं मार्केटिंग चालू आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग नाही काहीच दिवसात मार्केटमध्ये येईल आता तुम्ही खेळतात कशावर मोबाईलवर पण हा मोबाईल वरचा नाहीये कारण मोबाईल उघडला की सगळ्यांचे घरच्यांचे डोळे त्याच्याकडे असतात बाबांचा रागीट आवाज मॉम ची नजर काहीतरी शोधते सांगणारी आणि इतर फ्रेंड्स ची नंबर शोधणारी किती लोकांना दिसणार नाही असा मोबाईल वापरायचा यापेक्षा हा खेळ भरा आपण तीन-चार माणसं आपल्या टेबलावरती ठेवून हा खेळू शकतो तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यांनी काहीतरी लिंक दिली आहे तुम्हाला ती लिंक शेअर करतो तुमच्याबरोबर आणि त्यावरच बघा ते कायम 
 शशांक 

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

धन्य ते गायनी कळा

धन्य ते गायनी कळा
गायन कलेचे महत्व आणि मानवी आयुष्यातले त्याचे महत्व जाणूनच आपल्या प्राचीन संस्कृतीने गायन कलेला पंचम वेद म्हणून संबोधले आहे. समर्थ रामदास सारख्या संताने पण "धन्य ते गायनी कळा"म्हणून गायन कलेचा गौरव केला आहे.
मराठवाडा आणि देवगिरी म्हणजे संतांचे माहेरघर.जवळच्या पैठण ची ख्याती दक्षिण काशी म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. वेरूळची लेणी घृ ्णेश्वाराचे मंदिर ,देवगिरीचा किल्ला ,हि महाराष्ट्राची आभूषणे संत संस्कृतीचा वारसा घेऊन औरंगाबाद ,पैठण ,हि शहरे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला खुलवतात आहेत.
आज औरंगाबाद च्या एका युवा कलाकाराचा जन्मदिवस आहे ,त्या सुरेल आणि सुरेख कलाकाराला मैत्रायनाच्या हार्दिक शुभेच्छा .
प्राध्यापक राजेश सरकटे आणि त्यांची "स्वर विहार "संस्था माहित नसलेला माणूस शहरात नसावा.आणि नितीनच्या मराठी भावगीतांवर आशिक झाला नाही असा युवक औरंगाबादेत नसावा असलातर कदाचित बहिरा तरी असावा.
नितीतीन सरकटे हे फक्त तरुणाईचेच आवडते नाव नाही तर बुजुर्गांचेही लाडके नाव आहे ,वेरूळ महोत्सवाचे रंग
नितीनच्या दमदार आणि ओजस्वी अवजावाचून रंगतच नाही. नीतींची पंढरीची वारी रंगवणारे गाणे चालू होते तेव्हा वाटते कि तो विठूराया पंढरी सोडून पैठणच्या मार्गावर येतोय त्याच्या वारीला भेटायला ,, आणि नितीन स्वरासाधानेत येवढा मग्न असतो कि त्या बापड्या पांडुरंगाला द्यायला नितीन कडे विटाही नसते. नितीन गातो ते मजा म्हणून नव्हे तर उपासना म्हणून.पितृतुल्य वडील भावाच्या उपासनेचे दृश्यस्वरूप म्हणजे पुत्ररूप नितीनचे सुगम गाणे.
नितीन गाणे सुगम संगीत असते सुगम म्हणजे सगळ्यांना आवडणारे आणि समजणारे.
कलाकार हे परमेश्वराचे दूत असतात ,त्याच्या ब्राम्हस्वरूपाचे गायन ते करतात फक्त मार्ग वेगवेगळे असतात .
ज्या मार्गाने भावाच्या मार्गदर्शना खाली नीतीत गातो ते सर्वांचे गाणे आहे भाषा प्रांत आणि भावनांना ओलांडून जाणारे गाणे.
ह्या गाण्याला कसलेही बंध नाहीत ते मुक्त आहे म्हणूनच सुगम आहे ,सुगम संगीताच्या ह्या देवगिरी बादशाहाला मैत्रायानाचा सलाम.
शशांक रांगणेकर .मुंबई. 

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतातआणि हा देवाचा आशीर्वाद जर निशब्द येत असेल त्याचे रूप गंध फारच मनोहारी असतात.काही कविता भाषेला संपन्न करतात आणि कवी जनमानसाला.मराठी कविता संपली म्हणणाऱ्या टीकाकारांना मिळालेले एक निशब्द उत्तर जे देवा घरून आले आहे.मराठी कविता अमर आहे अक्षर आहे सांगणारे हे उत्तर.
मराठी कविता हि मराठी माणसाची समाजाची एक हृदयस्थ जिवंत जाणीव,"राकट देश कणखर देश दगडांच्या देशा"म्हंटल्या गेलेल्या देशाचे रूप दिसते हळुवार कवितेत आणि र्या रुपाला रंग देतात कवी.
एक असाच शब्दांना भावांचा रंग देणारा एक कवी निशब्द देव.
अतिशय नाजूक तरीही अत्यंत प्रभावी शब्दात सुख दुक्खाचे मोहर फुलवणारी यांची कविता हि मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे.
 
देवांची कविता जशी नाजूक आहे हळुवार आहे तशीच मानवी अपप्रवृत्तींवर कोरडे ओढणारी हि
आहे.
"गोष्टी नको नकोत्या सांगून लोक गेले ..हि अशीच एक सुन्न करणारी कविता अतिशय थोड्या शब्दात कवीची सल वेदना प्रकट करणारी त्याची कविता थेट वाचकांच्या हृद्याच भिडते.
मानवी जीवन सुख दुक्खांचा एक क्यालीडोस्कोप प्रत्येक धक्क्य बरोबर काचांच्या आकृत्या बदलत असतात.सुख कधी कुठे संपते आणि दुखाची झळ लागत जाते ते काळातही नाही.सुख्दुखाच्या ह्या लहरींवर मानवी जीवन तरंगत असते आणि नेमकी तीच अस्थिरता ह्या कवीच्या कवितेत डोकावून जाते.
ह्या देवांची मला भावलेली एक कविता "म्हणून तू रडली होतीस न आई ,"हा लेख लिहिता लिहिता मला ती वाचायला मिळाली ,लहान मुलाच्या मनातले निरागस दुख्हाचे कढ,देवा रे देवा किरी भन्नाट लिहितो माणूस अगदी फोडां प्रमाणे ठसठसणाऱ्या अगतिकतेकी नेमकी पण निरागस सल.
दाखवतो आणि तरीही तू मला पाहिजे ते सर्व दिल होतस म्हणत समाधानाची साय हि पसरवतो .दुक्खाला शब्दांची झबली चढवणारी ह्याची कविता मातृत्वाचे मंगल स्तोत्र गाते. .आजची श्यामची आई आणि तिचा श्याम आज ह्याच्या कवितेत दिसतो.
ह्याची कविता वाचकालाच निशब्द करते ह्याच्यावर चार शब्द लिहिण्याची ताकतही माझ्या शब्दात नाही हा माझ्झा लेख म्हणजे सूर्याला ओवाळणारी पणतीची ज्योत.निशब्द तुझ्या शब्द प्रभुत्वाची हि एक मैत्रायानाची प्रेमळ पावती समज आणि मान्य करून घे.
शशांक रांगणेकर मुंबई ९८२१४५८६०२