गुरुवार, १० मे, २०१२

चिन्मय पाटणकर

चिन्मय पाटणकर
पत्रकार ,आजची पत्रकारिता ,पीत का श्वेत एक जन सामन्यांच्या मनात पुन्हा पुन्हा उठणारा प्रश्न ,त्यांची आणि आणि त्यंच्या बातम्यांची विवेचनाची आजच्या पेड news च्या काळात विश्वास अर्हता कायम आहेका.का सगळेच विकाऊ. जन सामान्यांना ग्रासणारे प्रश्न ,पत्रकार कोण साठी काम करतात ,लोकांसाठी कि त्यांच्या मालकांसाठी .अनेक प्रश्न .
महाराष्ट्राच्या समाजजीवनावर साहित्यावर ,प्रगतीशील विचार धारणेवर पत्रकार आणि वृत्तपत्राचे फार मोठे ठसे उमटत असतात .
वृत्तपत्रात आलेली बातमी खोटी नसणार अशी विश्वासार्हता अजूनही महाराष्ट्रात टिकून आहे आणि त्या मागे टिळक आगरकर,अत्रे खाडिलकर इत्यादी दिग्गजांनी आपली सचोटी आणि पुण्याई उभी केली आहे.
महाराष्ट्रीय पत्रकारिता विकाऊ नाही ह्याचे शेकड्यांनी दाखले मिळत असतात.सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचे एक अंगभूत कर्तव्य मरठी भूमीत अजूनही चोख पाणे पार पडले जाते.
वृत्तपत्र लोकशाहीचा एक महत्वाचा आधारभूत स्तंभ समाजाला जातो .,आणि पत्रकारांचे काम जागल्याचे असते ,समाजातल्या दुष्प्रवृत्तीनवर लक्ष्य ठेवणे आणि वेळीच त्याचा पद फास्श करणे हे त्यांचे एक कर्तव्य .
पण समाज जीवनात साहित्याचे ,कलांचे झरे वाहत राहायलाच हवे समाज जीवन सुखद होण्यासाठी संपन्न होण्यासाठी ह्या अंगांचीही जरुरी आहे ,साहित्य नाट्यकला चित्रपट कविता अवांतर लेखन सारख्या दालनाची दाखल अंदाजी घेणे आणि त्या दलानाशी समन्वय साधणे हेही हाडाच्या पत्रकाराचे गुण आहेत. शुष्कता नव्हे तर शोधक सर्जनशीलता ,आणि संवेदन शीलता हे पत्रकारितेची अष्टांगे ,पत्रकार केवळ बातमीदारच नव्हे तर सामालोचाकाही असायला पाहिजे.
चिन्मय पाटणकर म.टा.पुण्याचा उपसंपादक
एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व ,तरुण रसिक कवी आणि लेखकही ,प्रतिबिंब नावाचा त्याचा एक ब्लोग आहे त्या ब्लोग आरचे त्याचे स्फुट लेखन खरोखर अभिनंदनीय ,सोपी सरळ तरुणाईला भावेल अशी तरल भाषा ,विषयांची विविधता ,अभ्यासू समालोचन आणि वाचकांशी साधलेला सहज संवाद हि ह्याच्या लेखनाची वैशिष्टे पण तरीवी त्यामागून डोकावणारी पत्रकारिता .
अभ्यासपूर्ण लेखन ,विषयाची पूर्ण तयारी आणि नेमक्या शब्दांचे वापर हा त्याचा लेखंगून खरोखर जाणवत असतो .
नाटक आणि चित्रपट हे याच्या विशेष आवडीचे विषय.आणि त्यासाठी त्याची लेखणी तलवारीची धार घेते.नाट्यगृहांच्या दुर्गातीचे यतार्थ वर्णन करणारा "त्याचा कोणी नाट्यगृह देता का नाट्यगृह हा लेख वास्तवाचे कोरडे संबधितांच्या पाठीवर ओढणारा आहे.
चिन्मयच्या वालवर निवडुंगाचा फोटो आहे हिरवागार आणि कांटेरी "भालेतरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू"म्हणून बजावणारा आणि हि कंटक शल्ये तोक्दारच आहे म्हणून सांगणारा .ह्या निव्दुन्गाला मैत्रायानाचे सलाम.
शशांक रांगणेकर.
९८२१४५८६०२

रविवार, १८ मार्च, २०१२

स्नेहेंद्र एक ब्रम्ह कमळ

स्नेहेंद्र एक ब्रम्ह कमळ
स्नेहेंद्र
एक ब्रम्ह कमळमाझ्या मनात एक सदैव विचार येतो कि आवड प्रेम आणि भक्ती ह्यात फरक
काय आणि मग विचारांती कळते कि ह्या एकाचा भावनेच्या चढत्या कमानी आहेत ,त्या चढत्या
कमानीचे एक दृश्य स्वरूप पाहायला मिळाले एका मनुष्य मात्रात नाव स्नेहेंद्र
नार्वेकर स्नेहा आणि रवींद्र चे हे एकुलते एक लाडके अपत्य, पण आईवडिलांची शिस्त आणि
शिकवणच अशी कि आई वडिलांनाच काय पण इतरानाही आदराने वागणूक देणे हाच ह्याचा मूलधर्म
. सर्वप्रकारच्या संगीताची उत्तम जन जाण हित्याचा गुणविशेष आहे ,सवाई गंधर्व
महोत्सवात ह्याची हमखास उपस्तीती असते. कुठल्याही विषयाचा अभ्यास करत त्यावर
अर्थपूर्ण विवेचन करणे हे त्याला मनापासून आवडते ,निसर्गरम्य स्थळांपासून
मानवनिर्मित आश्रयाची मुसाफिरी करणारा हा कलंदर मुशाफिर "चराती चरतो भगः"ह्या
सुवचानावर पूर्णतः विश्वासून आहे . स्नेहा आणि रवींद्र चे हे एकुलते एक लाडके
अपत्य,पण आईवडिलांची शिस्त आणि शिकवणच अशी कि आई वडिलांनाच काय पण इतरानाही आदराने
वागणूक देणे हाच ह्याचा मूलधर्म .हिमालयाच्या पर्वत राजीत ब्रम्हकमळ फुलते
म्हणतात

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

maitrayan

=0
गुरुजींची आभाळ माया
धीरज
डोंगरे ,ठाणे शहरातला एक शहरातला एक सुशिक्षित नवयुवक ,सुखाने कुठेही नोकरी करून करत जगला असता पण काय करणार ,धीरजला दुर्बुद्धी सुचली आणि शिक्षण क्षेत्रातगेला
तेही कुठे एखाद्या मोठ्या उच्चभ्रू वस्तीतल्या शाळेत अथवा क्लास मध्ये गेला असता तर
धीरजचेच  नव्हे तर  चार पिढ्यांचे भले झाले असते ,कारण आजकाल शिक्षणाचा धंदा तेजीत आहे ,पण तो धंदा म्हणून केला तर ,व्रत म्हणून स्वीकारले तर परिणाम "धीरज डोंगरे"
अरेरे काय् हे  आपल्याच पायावर डोंगराएवढा धोंडा पाडून घेणारा हा धीरज दगडच असावा खरे आहे दगडच आहे तो मित्रानो साधासुधा नव्हे मैलाचा दगड .अहिक सुखाचे मार्ग न शोधता खऱ्या सुखाचे मार्ग चोखाळणारा एक देवव्रत ,आदिवासी इलाख्यात जाऊन तिथल्या  मुलांना शिकवणारा ,माणूस बनवणारा एक देव्व्रती शिक्षक .धीरज शहापूरपासून कित्येक मैलांवर असलेल्या "बेलवली"नावाच्या गावात प्राथमिक शाळेत शिकवतो ,आदिवासी पाड्यात चालवल्या गेलेल्या शाळेत आणि शासनाच्या जाहिरातीत दिसणाऱ्या शाळेत किती तफावत असते हे वेगळे सांगायची  जरूरच नाही ,पण सत्यातल्या शाळा शासकीय जाहिरातीतातल्याच नव्हे तर त्याहूनही चांगल्या बनवण्याचा चंगच जणू त्याने बांधला आहे ,ग्रामीण भागात शाळा शिकवण्याला शाळा हाकणे असाही एक समानार्थी शब्द वापरला जातो सरकारी शाळांना चराऊ कुरण समजणारे काही पुण्यवंत शिकवण्याचा जोड धंदा करत करत ,आर्दश शिक्षक म्हणून प्रमाण पत्रके मिळवतात आणि बाकी आयुष्य त्यावर मिळणाऱ्या लाभांवर सुखनैव घालवतात.पण धीरज कुठल्या मातीचा बनला आहे परमेश्वरच जाणे,हा डोंगरा एवढा माणूस अक्षरशः माणसे घडवतोय , सर्व सामान्य मुलांना मिळणाऱ्या प्राथमिक सोईपासुनही वंचित असलेल्या आदिवासि मुलाना माणसात आणतोय , शिक्षणाचे महत्व काय आहे हे तर शिकवतो आहेच पण त्याहून जिकीरीचे काम म्हणजे त्यांच्या पालकांना त्यांच्या भविष्यासाठी शिक्षणाचे महत्वही पटवतो आहे ,आणि एवढे करूनही त्याचे वेतन एकाच मिळत असावे हाची मला खात्री आहे ते वेळेवर मिळते कि नाही  ह्याची मात्र खात्री नाही. धीरजच्या शब्दात सांगायचे झाले तर त्याचे विद्यार्थी कित्येक पटीने ती परत फेड करतात त्यांचा होणारा उत्कर्ष त्यांनी त्याच्यवर टाकलेला एक विश्वास आणि त्यांचा खडतर आयुष्यात धीरज मुळे उमटणारी "एखाधीच का होईना" स्मित रेषा, ह्या परताव्यावरती मला आभाळा एवढे सुख मिळते ..सुखाची तुम्हाम्हला न कळणारी हि एक वेगळीच परिभाषा ,पण ती कळणारी एक संस्था ठाण्यात ठाण मांडून उभी आहे ,कित्येक सेवाभावी आणि पर्यटन प्रेमी युवकांची एक संस्था "दुर्ग सखा"दर्या डोंगरात फिरणारी आणि" मानवते एक एक पाऊल टाकणारी एक संस्था ,धीरजच्या आठवणीला पुण्यस्मरण म्हणावसे वाटते जिवंत व्यक्तीच्या स्मरणाला पुण्य शब्दाचे अमरत्व प्राप्त तेव्हाच होते जेव्हा ओठांवर शब्द येतात ,गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर ,गुरुर साक्षात परब्रम्ह तस्म्ये गुरवे नमः '
मास्तरला गुरुपद प्राप्त करून देण्याला माझ्या ह्या मित्राला माझे सादर प्रणाम
माझ्या मैत्रायाणातला हा  एक  गुरु चारित्री अद्ध्याय                 
शशांक रांगणेकर

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे

कोण असशी तू माझा हे मला न समजायचे
कोण नसशी तू माझा हे तुला न उमगायचे
मी होता रणीचा पार्थ तू सांगशील रे गीता
विसर बंध नात्याचे लढ अन्यायाशी पुरता
मोहरता फुले मोहाची स्पर्शे गळतील सारी
आनंद अस्पर्षाचा हि तुझीच किमया न्यारी
सूरदास अंध मी होता तू होशी माझी काठी
जग शत्रू होता सारे तू एकालाच मम पाठी
द्वैतातून  अद्वैताचे रेखाशीस तू चित्र
मम जन्म जन्मांतरीचा एकालाच तू मैत्र


शशांक रांगणेकर
मुंबई










गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

प्रिय जनहो ,


माझ्या मित्रानो आपल्या अजयचा मराठी चित्रपट १० तारखेला प्रदर्शित होतोय ,अजय नाईक एक साधा सरळ स्वभावाचा मराठी मुलगा ,चित्रपट निर्मितीत उतरला आहे, आपल्या मराठी मुलांना एकत्र करून एक स्वच्छ साधा आणि तुम्हाला आवडेल असा मराठी चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आला आहे ,अजयच्या चेहरया वरचे सोज्वळ आणि प्रासादिक भाव हेच त्या चित्रपटाचे अतरंग ,आणि मराठी मनाला संस्कृतीला शोभतील असे दृश्य रंग ,ह्या साऱ्या रंग संगतीत तुमचा सहभाग हा जीवन रंग ठरणार आहे,सतर्न्गीच्या जाहिरातीतली ती मराठी तरुणाई बघा दृष्ट लागेल असे एक जीवंतपण चेहऱ्यावर बाळगून तुमच्या सक्रीय पाठींब्या कडे पाहतेय ,त्यांना निराश करूनका आपल्या घराचे एक कार्य असल्या सारखे त्यात सहभागी व्हा ,चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा,

"आम्ही सर्व मराठी आहोत आणि आम्ही एका मराठी मुलाने निर्र्मिलेला चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघू असे आश्वासन त्याला द्या ,तुमच्या पाठिंब्याची त्याला जरूर आहे,

"एक मराठी माणूस म्हणून तुम्हा सर्वाना विनंती करतो कि अजयचा मराठी चित्रपट जो शत प्रतिशत मराठी आहे तो यशस्वी करा "त्याच्या wallavar जाऊन तसा सं

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

       सतरंगी रे
चिरंजीव अजय ,
सतरंगी प्रदर्शनाचा दिवस जवळ येतो आहे ,काही दिवसातच हि शुभ घडी संपन्न होईल,चित्रपट क्षेत्रात पुनः एकदा मराठी माणूस विजयाने मिरवेल ,प्रसवाच्या वेणा दिसाव्यात तसाच काहीतरी होतंय ,काळजी करू नकोस ,तन मन आणि धनही अर्पून तू हा चित्रपट निर्मिला आहेस ,परमेश्वर तर तुझ्या पाठीशी आहेच पण अवघा मराठी माणूसही तुझ्या पाठीशी उभा राहील ,दुसर्या निर्मितीची सुरवात हि आतापासून कर,चेहऱ्यावरचे श्रांत भाव दूर कर आणि सात रंगी चे साती रंग खुलवणारा हसरा फोटो प्रोफाईल वर टाक,लक्ष्यात ठेव तू आम्हा सर्व मराठी जनतेचा "लाडका अजय"आहेस आम्हा सर्वांच्या शुभेच्छा ,तुझी आणि तुझ्या टीम ची अविश्रांत मेहनत आणि तुझ्या माता पित्यांचे आणि गुरु जनाचे आशीर्वाद तुला सांगताहेत "अजय विजय "तुझाच आहे.तुला तुझ्या टीम ला आणि सतरंगी ला हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
त .टी.
मराठीच्या कैवारी असलेल्या सर्व राजकीय पक्षानो या शत प्रतिशत मराठी चित्रपटाला पुरस्कृत करा आणि मे मराठीचे पांग काही अंशाने का होईना फेडण्याचा प्रयत्न करा.
       सतरंगी रे
चिरंजीव अजय ,
सतरंगी प्रदर्शनाचा दिवस जवळ येतो आहे ,काही दिवसातच हि शुभ घडी संपन्न होईल,चित्रपट क्षेत्रात पुनः एकदा मराठी माणूस विजयाने मिरवेल ,प्रसवाच्या वेणा दिसाव्यात तसाच काहीतरी होतंय ,काळजी करू नकोस ,तन मन आणि धनही अर्पून तू हा चित्रपट निर्मिला आहेस ,परमेश्वर तर तुझ्या पाठीशी आहेच पण अवघा मराठी माणूसही तुझ्या पाठीशी उभा राहील ,दुसर्या निर्मितीची सुरवात हि आतापासून कर,चेहऱ्यावरचे श्रांत भाव दूर कर आणि सात रंगी चे साती रंग खुलवणारा हसरा फोटो प्रोफाईल वर टाक,लक्ष्यात ठेव तू आम्हा सर्व मराठी जनतेचा "लाडका अजय"आहेस आम्हा सर्वांच्या शुभेच्छा ,तुझी आणि तुझ्या टीम ची अविश्रांत मेहनत आणि तुझ्या माता पित्यांचे आणि गुरु जनाचे आशीर्वाद तुला सांगताहेत "अजय विजय "तुझाच आहे.तुला तुझ्या टीम ला आणि सतरंगी ला हार्दिक शुभेच्छा.
शशांक रांगणेकर
त .टी.
मराठीच्या कैवारी असलेल्या सर्व राजकीय पक्षानो या शत प्रतिशत मराठी चित्रपटाला पुरस्कृत करा आणि मे मराठीचे पांग काही अंशाने का होईना फेडण्याचा प्रयत्न करा.