Tuesday, May 29, 2012

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..

अनंत हस्ते कमला देता किती घेशील दो …..
अमेयच्या बाबतीत असाच घडलाय ,परमेश्वराने रूप आणि गुणाची नुसती उधळण केली आहे ,आणि त्याबरोबर सहृदयतेचे लेणे बोनस म्हणून फ्री ,चेहऱ्यावरचे अजातशत्रू भाव हे ह्या निरलासतेचे दृश्य स्वरूप ,,कुठलाही व्यवहारी भाव नाही वैश्य वृत्तीचा पूर्ण अभाव ,आणि चेहऱ्यावर मनातून उमटणारी समाधानी वृत्ती ,परमेश्वरानी दिलेल्या सुखाची पावती चेहयावर फडकावत हा युवक सदैव वावरत असतो ,
सुखी माणसाचा सदरा घालून आलेला अमेय एक आदर्श वाटतो ,,जीवनातले सुखाचे मार्ग तुमचे तुम्हीच शोध ,आणि शोध म्हणजे सापडेल असा संदेश देणारा अमेय अस्पर्शचैतन्याचा अमृत स्पर्श च आहे
शशांक रांगणेकर


Monday, May 28, 2012

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी




नाद स्वर आणि सूर ,शब्द ,परमेश्वरा ने माणसालानव्हे तर संपूर्ण जीव सृष्ठीला दिलेली एक अलोकिक देणगी ,आणि ह्या देणगीची आराधना किंवा उपासना करणारे कलाकार मग ते गायक असोत ,वादक असोत अथवा कवी किंवा चित्रकार ,सर्व परमेश्वराचे प्रेषित ,त्या प्रेषितांचे ह्या भू तलावारचे अस्तित्व हि ईश्वराच्या अस्तित्वाची जिवंत ओळख.नाद ब्राम्हची उपासना हे ईश्वरी उपासनेचे अनन्य रूप .

शब्द आणि सुरांबरोबर ताल नाद नसतील तर तर गायन अगदीच फिके वाटते ,गाण्या बरोबर तबला पेटीची साथ नसणे म्हणजे हळदी कुंकवा शिवायची सवाष्ण .शब्द आणि सुरांबरोबर गाण्यात पेटी आणि तबल्याचे मेहुण पाहिजेच पाहिजे आणि त्रिताल झपताल ह्यांची साथ नसेल तर सगळेच बेचव आणि अळणी.

कोंकण म्हणजे परशुराम भूमी ,तेज आणि रूप ह्याचे मनमोहक चित्रण कोंकण वासीयांच्या चित्रित होतेच.रूप तेज आणि गुणाचे संचित साथीला घेऊन येणारे एक गुणी व्यक्तिमत्व ."प्रसाद विलास पाध्ये

".प्रसाद एक तबला नवाझ आहे .नवाझ म्हणजे राजकुमार ,खरोखर राजकुमाराच सगळ्या गायकांना हवाहवासा वाटणारा,उदार दिलदार आणि आश्वासक. गायकाला साथ करताना स्वतःचे अस्तित्व दाखवत त्याच्या गाण्याला सांभाळणारा एक मित्र.

बऱ्याच वेळेला स्वतःचे मोठेपण गायकांना त्यांच्या कमजोर गायकीच्या कैचीत पकडून दाखवण्याची फार हौस असते पण प्रसाद नावाप्रमाणेच आहे सह कलाकाराला साथ करणारा एक ईश्वरीय प्रसाद भासणारा.मी ह्याला फाडला किंवा भाजून खाल्ला असा कधीही विचार न करणारा .

iit बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत विध्यार्थ्यांचे माहेर घर.जणू विज्ञान आणि प्रज्ञा साठी साथीने पाणी भरतात.पवई येथील iit मध्ये प्रसाद तबला शिकवतो .कला आणि विज्ञानाचे मनोहर फ्युजन प्रसादने ह्या लहान वयातही अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे .

पद्मजा फेणाणी ,अश्विनी भिडे,स्वीकार कट्टी पंडित उल्लाहास बापट ,श्रीरंग भावे सारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे.

गुणाचे भांडार ,बोटांवर जणू प्रत्यक्ष शिव शंकराने . दिलेले नाद ब्रम्हाचे वरदान ,आणि रूप तर "रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असे उद्गार आणणारे ,तरीही चेहऱ्यावर निरहंकारी प्रासादिकता विलसणारे भाव. हे तर खरोखरीचे नाक्षत्रांचेच देणे .

प्रसाद च्या वाल वर त्याचे अनेक फोटो लावलेले आहेत आणि काही निसर्ग चित्र णे हि लावलेली आहेत ,त्यातले एक छायाचित्रण आहे हिमालयातल्या डोंगर दरयांचे,आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेला प्रसाद ,मनात विचार बळावतात नाद्ब्राम्हचे रूप हि असेच असेल ना पाठच्या वृक्ष राजी सारखेच उत्तुंग आणि मनोहारी अगदी पाध्यांच्या प्रसाद सारखे.

प्रसाद कोकणचा आहे तिथल्या हापूस सारखाच गोड फक्त गोड नव्हे तर स्वताची एक वेगळीच चव सांगणारा अनोखी आणि आगळी वेगळीच शब्दही अपुरे पडणारी.

त्याच्या तबल्याचा नाद ऐकून म्हणावसे वाटते "आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा तबला वाजवतो "

रूप आणि गुणाचे मनोहारी संचित घेऊन आलेल्या ह्या नादब्रम्ह उपासकाला मैत्रायानाच्या हार्दिक शुभेच्छा

शशांक रांगणेकर



मुंबई ९८२१४५८६०२

Thursday, May 24, 2012

चाफ्याच्या सुगंधे मन येईल मोहरून

चाफ्याच्या सुगंधे मन येईल मोहरून
प्राजक्त अंगणीचा वर्षेल मंद धून
त्या प्रमाथी सुरांचे गाईन मी तराणे
सूर शब्द गंध ह्यांचे होई सुरेल गाणे

गाण्यात सूर हे माझे तू शब्द साज गुंफावे
बरसता मेघ हे मनीचे तू इंद्र धनु फुलवावे
सतरंगी इंद्र धनुचा फुलता रंग पिसारा
तनु येईल मोहरून स्पर्शता गंध फुलोरा
 त्या स्पर्शाचे हे गाणे कधीच न संपावे
जन्म जमान्तारीचे हे व्हावे अक्षय गाणे
शशांक रांगणेकर
मुंबई

Tuesday, May 22, 2012

मुले युद्धावर गेली कि आई वडलांना काय वाटते


रात्र दिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग ,ह्याचा अनुभव दिवसेंदिवस येतोय ,आम्ह्ही खरोखरच सुखाशी भांडतोय ,दुक्खाशी भांडायचे दिवस दूर गेले आहेत.आता भांडतोय सुखाशी ,
इमारतीचे मजले उंच उंच होताहेत आणि शिस्त ,आणि सावधानी ह्याचीपातळी  मात्र खालावते आहे ,"चालता हैं सब कूच चालता हैं "हि बेफिकिरी मात्र आमच्या समाजाला पोखरते आहे ,,
१९ तारखेला मी आणि माझी पत्नी बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे सभागृहात WE4 समूहाने सादर केलेल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.आजचे रविकिरण मंडळ आपल्या कवितांचे सादरीकरण कसे करेल ह्या बद्दल एक मनात उत्सुकता होती.
प्रेक्षागृहाच्या तळ मजल्याशी पोहताच कळले कि लिफ्ट चालत नाही आहे त्यामुळे गिर्यारोहण करूनच प्रेक्षागृहात प्रवेशावे लागले मनात एक विचार आला नो पेन नि गेन "
सभागृहाच्या बाहेर सुहास्य वदनाने उभ्या असलेल्या ललना निमंत्रीताना गजरे आणि चाफ्याची फुले देत होत्या ,काव्यवाचन किती सुगंधी होईल ह्याची एक झुळूकच होती ती .वातानुकुल यंत्रणा बंद असल्यानी भासणारा उष्मा प्रेक्षकांच्या उत्साहाने सुसह्य वाटत होता एकंदरीत उष्मा सुसह्य होता ,पण काम काळ वेगाचे गणित हे असतेच ,कार्यक्रमाला एवढा वेळ का लागतोय ह्याचे कारण कळले तेव्हा मात्र पाया खालची जमीनच हादरल्या सारखी वाटली ,"मंदार आणि समीर असे दोन कलाकार बंद लिफ्ट मध्ये इतर सहप्रवाश्या बरोबर अडकले आहेत त्यांना लिफ्ट मधून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशी बातमी कानावर आली .
प्रेक्षागृहात अस्वस्ताथा पसरली होती गजरे सुकू लागले होते आणि चाफा जणू बोलेनाच झाला होता .आमची दोन तरुण मुले संकटात अडकली होती ,आमची असहायता आम्हाला उभी जळत होती ,मराठी साहित्य आणि कला क्षेत्रांशी संबंधित बराचश्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या ,प्रेक्षागृहाचे कर्मचारी आपल्या प्रयत्नाची शर्थ करीत होते साधारण अर्धा ते पाऊन तास आपत्कालीन परिस्तिथी शी आमची दोन मुले झगडत होती ,"सतत कानात पराभवाच्या दोन ओळी एकू येत होत्या "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा "परदुख शीतल असते म्हणतात पण संवेदिनशील मनाला ते कधीही शीतल नसते .आणि इथे तर आमच्या मुलांना होणारा त्रासाच आम्हाला भेडसावत होता.हताशपणे वांझ सूचना उपसुचानाच्या भडिमारात अवघा प्रेक्षक विव्हळत होता .मी आणि पत्नी एकमेकाच्या जवळच उभे होतो आणि नकळत दोघांचेही हात एकमेकांना घट्ट धरत होते एका अनामिक भीतीने,कळात होते कि जीवन आणि मृत्यूचा मधले अंतर किती लहान आहे ते केवळ एका लिफ्ट च्या जाळी एवढे.
तगमग ह्या शब्दाचा नेमका अर्थ जाणवतच नव्हता तर जाळत हि होता. . आपत्कालीन यंत्रणा पूर्णतः काही वेळ ठप्पझाली होती.
परमेश्वर दयाळू आहे ह्याची खात्री त्यांनीच पटवून दिली आणि कोणाच्याका कोंबड्याच्या ओरडण्याने पहाट झाली आणि लिफ्ट मधली माणसे सुखरूप बाहेर आली कार्यक्रमाला सुरवात झाली .आनंदी आनंद झाला कार्यक्रम छान रंगला पण मनातली भयाची छटा मात्र पुंसली जात नव्हती ,मनात परत परत विचार येत होता लिफ्ट आणि काही वेळ चालू झाली नसती तर ,मन चिंती ते वैरी चिंती म्हणतात हेच खरे झाली होती. जीवन आणि मृत्यू काही श्वासांच्या अंतरावर पाठशिवणीचा खेळ खेळत होते. युद्धावर गेलेल्या मुलांच्या आई वडिलांना काय वाटत असेल त्याचा अनुभव क्षण भर पुरता का होईना आम्हाला आला.

ह्या सर्व घटनांना जवाबदार कोण उत्तर आम्ही स्वतःच ,आमची बेफिकीर वृत्ती ,सब चलता हैं असे म्हणणारी पराभूत मानसिकता ,मला काय त्याचे असे समजणारी गेंड्याची कातडी.
आमची सार्वजनिक नाट्य गृहे आणि त्यांची सुरक्षितता हा प्रश्न्या परत एकदा ऐरणीवर आला आहे ,आपत्कालीन यंत्रणा तिथे काम करते आहे कि नाही हे पाहण्याचे उत्तरदायित्व कोणाचे हे तपासण्याची वेळ आलेली आहे,जर हे असेच चालत राहिले तर बळजबरीचे हौतात्म्य निरपराधांच्या माथी मारले जाईल.
महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली बरचशी सार्वजनिक उपक्रम आहेत त्या ची सुरक्षितता हि महापालिकेची नैतिक जवबदारी आहे ,शिवसेनेच्या हातात बाळासाहेबांनी भगवा झेंडा दिला आहे आणि तो फडकतो आहे एका काठीवर ती काठी वेळप्रसंगी नाठाळाच्या माथी हाणण्यासाठी आहे.
we चार ह्या मराठी कार्यक्रमाला उडालेले आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे नक्कीच डोळ्यात अंजन घालणारे होते ,त्यामुळे झालेले नुकसान भरून देणे हि महापालिकेची कायदेशीर असेल नसेल पात नैतिक जवाबदारी जरूर आहे,ह्या पापाचे परिमार्जन हा कार्यक्रम महापालिकेने निशुल्क प्रायोजित करून करावे.आणि हे शासक आपले उत्तरदायित्व जाणतात ह्याचे उदाहरण घालून द्यावे.
शशांक रांगणेकर

Friday, May 18, 2012

we 4


  1. गुंतता हृदय हे .
    मराठी कविता हे मराठी मनाचे जागेपणीचे स्वप्न,ह्या स्वप्नाला अनेकांनी रंग रूप दिले आहेत ,ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत ,मोरोपंतांपासून,बा.सी.मर्ढेकर पर्यंत .अनंत फंदी पासून शाहीर पठ्ठे बापूराव पर्यंत ,सर्वांनी ह्या स्वप्नाला गहिरे रंग दिले आहेत.
    काव्यगायन हा मराठी संस्कृतीत कार्येक्रमातला एक अविभाज्य सोहळा असायचा आणि अजूनही तो शाबूत आहे.आपणच रचलेल्या कविता आपल्याच सुरेल आवाजात गायच्या हा रवी किरण मंडळ ह्या काही तरुण कवींच्या समूहाने आपल्या कवितांनी आणि काव्य गायनाने उभा महाराष्ट्र गाजवला होता .
    कुसुमाग्रजांची कविता,केशवसुतांची तुतारी,यमक्या वामनाची केकावली ,अनंत फंदी चे फटके ,आचार्य अत्रांची झेन्डूंची फुले , बालकवींची फुलराणी ,माधव जुलीयानाची ,भा रा तांबे ची नववधू,भटांची गझल हे मराठी कवितेच्या रस्त्या वरचे मैलाचे दगड ,ह्या अनंत शब्द शक्तीच्या जादूगारांनी मराठी कवितेला स्वरांच्या आणि सुरांच्या गोफात गुंफून रसिकांच्या समोर पेश केले.
    मराठी कविते बरोबर मराठी मन सुसंस्कृत आणि संपन्न करण्याचे काम ह्या कवी जनांनी केले. मराठी संस्कृतीच्या जडण घडणीत मराठी कविता आणि कवी जनांचा सिंहाचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही.
    ह्या सर्व पुण्यःवाचानी नावाचे पाठबळ पाठीशी घेऊन एक नवीन रवी किरण मंडळ उदयाला आले .

    आहे "we चार "ह्या नावाखाली .
    २५ ते तीस ह्या वयोगटातले हे तरुण मराठी कवितेला आणि काव्यागायानाला नव संजीवनी देण्याचे काम करताहेत ,
    कौतुक करायला शब्द अपुरे पडावे अशी ह्यांची आशयघन कविता ,श्रावणातल्या पावसासारखी अंगावर बरसते आणि मनाचा कोपरान कोपरा भिजवते .
    प्राजक्त देशमुख ह्या चार तरुण कवितले एक सुगंधी व्यक्तिमत्व ,मातीत रुजलेली ह्याची कविता उन्हा पावसाशी नाते ठेवते आणि शेतकऱ्याचे दुखः तरल शब्दात चित्रित करते ,मृद्गान्धाशी ओळख सांगत फुलणारी ह्याची कविता रसिकाला चातका प्रमाणे हा दुसरी कविता कधी ऐकवेल ह्याची वाट बघायला लावते ,
    मंदार चोळकर "परीकथेतील राजकुमारा"अशी साद घालावी असे वाटणारे रसरशीत उमदे रूप आणि त्याबरोबर तरल आरस्पानी शब्दांची ईश्वर दत्त देणगी घेऊन आलेले एक मोहक व्यक्तिमत्व .पावसा तुला आता बरसून गेले पाहिजे म्हणून सांगतो तेव्हा वाटते काय बिशाद आहे पावसाची न बरसण्याची ,मंदारने सांगितले तर पाउस कधी हि बरसेल ,त्याच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी.
    "मकरंद सावंत"ह्या चौघातले एक चिरंतन प्रेमाच्या रमल खुणांचेशब्द मोहर फुलवणारे मोहाचे झाड ,ह्याच्या शब्द शब्दात तिचे वर्णन बहरत असते ,ह्याचे शब्द म्हणजे प्रेमिकेने घेत्तलेली एक नाजूक अंगडाई .
    चौथे नावं "समीर सावंत "मराठी कवितेला यावनी लवंग लातिकेच्या रुपात घेऊन येणारी ह्याची कविता दक्ख्हन पासून दुअबा पर्यंत सहज पोहचते हिंदी आणि उर्दुशीही हितगुज करते.
    मनाला एक जागेपणी एक स्वप्न पडते ह्या चौघांचा एक कार्यक्रम चालू आहे मराठी तरुणाई ह्यांच्या सुरांवर शब्दांवर आणि स्वरांवर नागासारखी डोलते आहे ,आणि रविकिरण मंडळाचे सदस्य कवी ह्यांना आशीर्वाद देताहेत आणि म्हणताहेत "ह्याच साठी केला होता अट्टाहास "
    मराठी तरुणाईच्या ह्या अर्वाचीन रवी किरण मंडळाला मैत्रायानाच्या अगणित शुभेच्छा
    शशांक रांगणेकर
    मुंबई ९८२१४५८६०२

Tuesday, May 15, 2012

आनंद परब

आनंद परब


परमेश्वरी कृपेचे वरदान प्राप्त करूनच काही व्यक्ती जगात प्रवेशतात त्या भाग्यावन्तांच्या यादीतले एक नाव "आनंद परब".हातात पेन्सिल आली कि कागदावर चित्र तयार .निसर्गाची सुंदर चित्रे काढणे हा ह्याचा बालपणा पासून चा छंद.

चित्रकार हा मूलतः चोखंदळ आणि बुद्धिमान सादरकर्ता असतो ,कुठले रंग कुठल्या पार्श्व भूमीवर रंगवायचे ह्याचे उत्तम प्रतीचे ज्ञान हि चित्रकाराची धनसंपदा.त्याच्या चित्रकृती ह्या ज्ञानाने संपन्न होतात.



आनंद हा उत्तम प्रेझेन्तर असल्याने ज्या दुकानात पुमा ह्या जगप्रसिद्ध ब्रांड ची उत्पादने ठेवली जातात त्यांची मांडणी अधिका अधिक आकाशार्षक व्हावीत म्हणून आनंद कार्यरत असतो .

मराठी युवक विविध क्षेत्रात काम करतात आणि आपल्या कामाचा ठसा उमटवतात ह्याचे उत्तम उदाहरण "आनंद परब"त्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी आपला एक ठसा उमटवला आहे.

परमेश्वर हा उत्तम चित्रकार आहे त्याच्या कलेची एक पावती म्हणजे "आनंद परब"राजबिंडे रूप आणि चेहऱ्यावर विरजणारे आनंद दाई भाव ,मन मिळाऊ स्वभाव अजातशत्रू रूप "खुदा देता ही तो छप्पर फाडके "हेच खरे .

आनंद एक विलक्षण रसायन आहे त्याची एकांताप्रीयाता आणि सार्वजन मैत्री हातात हात घालून जातात.एखाद्या संध्याकाळी मित्रांच्या महिफिलीत बसलेला आनंद एकटाच असतो पण निसर्गाच्या कुशीत पावसाच्या धारात भिजणारा आनंद मात्र मनोमन फुलून जातो .

आनंद चे रंगरूप पाहता एवढा देखणं माणूस चित्रपट सृष्टी अथवा मोडेलिंग इंडस्ट्री पासून लपून कसा राहिला ,तेच कळत नाही त्या इंडस्ट्रीचे दुर्भाग्य हेच खरें.पण कधी कधी वेळ यावी लागते.



आनंद स्वप्ना पाहतो म्हण्यापेक्षा स्वप्ने त्याच्या भेटीला येतात ज्या देवळांना शिलपणा तो बघायला जातो ती त्याच्या स्वप्नात येतात ,आणि भविष्याच्या चित्र रेखा मनावर उमटवतात .

आनंद चा एक सुंदर फोटो फेस बुक वर आहे एका तळ्याचा काठावर बदकांच्या मेळाव्यात रमणारा आनंद दिसतो आहे ,मनात विचार आला नळ राजा चे राजबिंडे रूप घेऊन आलेला हा आजचा नळ राजा हंसा बरोबर कुठल्या दमयंतीला निरोप पाठवतो आहे .महाभारत कालीन कालीन प्रेम कथेचे हे आजचे रूप असावे का कारण इतिहास पुन्हा पुन्हा घडतो म्हणतात .

परमेश्वराने आनंदच्या रूपाने चीत्रीलेल्या देखण्या चित्रास मैत्रायानाचे अभिवादन

शशांक रांगणेकर

मुंबई

९८२१४५८६०२

Friday, May 11, 2012

वैद्यराज सुशांत पाटील

वैद्यराज सुशांत पाटील
लहानपणी ऐकलेले एक गाणे आठवले ,भोंडल्याचा फेर घेत घेत मुली म्हणायच्या "कोणी बोलवा माझ्या माहेरच्या वैद्याला ,हातात काठी पंचरंगी .तोंडात विडा केशराचा ,वैद्यराज चे हेच रूप माहित होते ,नाहीतर मुंबई शहरात रोग निवारणाचे काम डॉक्टरच करायचे ,निळ्या रंगाच्या बाटलीत प्रवाही औषध मिळायचे ,शक्य तो गोळ्या नसायच्या ,औषधाचा रंग लाल असायचा आणि त्या मुळे मुलांना तो फार आवडायचा रोग हि फार थोडेच असायचे सर्दी ,खोकला,ताप किंवा अपचन ह्या यादी पुढे यादी नसायची ,कधीतरी तय्फोड ,गालगुंड हि मंडळी भेटीला यायची पण बहुतेक रोग आमच्या डॉक्टर फाल्निकारांच्या आटोक्यात ले असत ,त्यांच्या दवाखाना ह्या पाटी खालील खोलीचा दरवाजा उघडून आत गेले कि अर्धे रोग निवारण व्हायचे आणि उरलेले डॉक्टरांच्या चेहऱ्यावरच्या आपुलकीच्या भावाने व्हायचे ,स्पेशयालीस्त  नसलेल्या जगात आमचे फ्यामिली डॉक्टरच आमच्या योग क्षेमाचा भार परमेश्वरा बरोबर वाहायचे ,लहानपण आणि फ्यामिली डॉक्टर ह्या दोन्ही गोष्टी एकदमच संपल्या ,आणि रोगांची चलति वाढली.
झुलत्या दरवाजाचे दवाखाने वातानुकुलीत चेम्बर मध्ये परवर्तीत झाले आणि फी बरोबर चिकित्सा हि वाढू लागल्या ,.
मुंबईला वैद्यराज फारसे माहित नव्हते ,पण खेडोपाड्यात मात्र आजीबाई च्या बटाव्यापासून वैद्य बुवांच्या काढे चाटण भस्म ग्रामीण जनतेला माहित होते ,पण आताच्या दहा वर्ष्यात आयुर्वेद ,पंच कर्मे ,आणि आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार पद्धतीचा उपयोग शहरातही होऊ लागला आहे आपल्या आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार पद्धतीला देशात आणि परदेशात मान्यता आणि लोकप्रियता मिळत आहे.आणि त्या मागे उभे आहेत अनेक आयुर्वेदिक संस्थाने घेतलेले अथक परिश्रम .शरीरा बरोबर मनाचे आरोग्य हा संदेश देणारे आयुर्वेदिक उपचार कमालीचे लोकप्रिय होत आहेत .वैद्याबुवांचे परिवर्तन वैद्याराजात होणारा प्रवास ह्या अथक परिश्रमाचा दृश्य सोबती सांगाती आहे.

आयुर्वेदाचार्य सुशांत पाटील ,एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व ,अश्विनीकुमारा सारखे पुरुषी सौंदर्याचे वरदान प्राप्त झालेला हा युवक रोगांचे निवारण करताना त्याच्या निरोगी आणि आश्वासक व्यक्तिमत्वाचे औषध म्हणून नक्कीच उपयोग करत असणार ,अर्धे रोग ह्याच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या चांदण्यानेच दूर होत असावेत .चंद्र प्रकाशात रोग निवारण होते हा एक संकेत आहे..
ह्याचे मनोगत वाचून कळते कि हा युवक केवढ्या टोलेजंग उंचीचा आहे ,आणि नुसतीच उंची नव्हे तर ह्याच्या माणुसकीची मुळे किती खोलवर पोहचली आहेत. आयुर्वेदाचा उपयोग केवळ व्यावसायासाठी नव्हे तर "बहुजन हिताय बहुजन सुखाय"करण्यासाठी असतो ह्या वर आणि आपल्या माता पित्यांवर आणि गुरु जनांवर अगाढ श्रद्धा ठेऊन वैदकी करणारा युवक खरोखर प्रशंसेस पात्र आहे.
आयुष्दार्पण सारख्या त्रैमासिकातून वैद्यराज एक सामाजिक चालवलाच चालवतात ,स्त्रीभ्रूण हत्या ,वृक्ष तोड ,बाल मजुरी ,वनसंपदा आणि संवर्धन अश्या अनेक विषयांवर समाज प्रबोधनाचे कार्य वेगवेगळ्या व्यासपीठांवर करतात .आयुर्वेद जनसामान्यानसाठी हे त्यांचे ध्येय आहे .
सहसा वैद्य औषधे सांगत नाहीत पण सुशांत मात्र कुठल्याही माध्यमातून औषधे सांगतो ,कारण त्याच्या मनात असलेले सामाजिक बांधिलकी वरचे प्रेम आणि आयुर्वेदावरची श्रद्धा .
सुशांत चे व्यक्तिमत्व नुसतेच सुधृढ नाही तर सुगंधीही आहे रसिकता ,चोखंदळ वृत्ती ,बहुश्रुत वैविध्यपूर्ण ज्ञान पिपासा हि त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे सप्तरंगी पैलू.
चंद्रप्रकाशात रोगांचे निवारण होये असा एक संकेत आहे त्या संकेताचे दृश्य रूप सुशांतच्या चेहरावर फुलणारे अल्लाहाद्दाई चांदणे आरोग्याचे ,सौदाहार्याचे आणि माणुसकी वरच्या प्रेमाचे ,त्या चांदण्याला मैत्रायानाचे शुभेच्छा पूर्वक अभीवादन
शशांक रांगणेकर
मुंबई ९८२१४५८६०२

Thursday, May 10, 2012

चिन्मय पाटणकर

चिन्मय पाटणकर
पत्रकार ,आजची पत्रकारिता ,पीत का श्वेत एक जन सामन्यांच्या मनात पुन्हा पुन्हा उठणारा प्रश्न ,त्यांची आणि आणि त्यंच्या बातम्यांची विवेचनाची आजच्या पेड news च्या काळात विश्वास अर्हता कायम आहेका.का सगळेच विकाऊ. जन सामान्यांना ग्रासणारे प्रश्न ,पत्रकार कोण साठी काम करतात ,लोकांसाठी कि त्यांच्या मालकांसाठी .अनेक प्रश्न .
महाराष्ट्राच्या समाजजीवनावर साहित्यावर ,प्रगतीशील विचार धारणेवर पत्रकार आणि वृत्तपत्राचे फार मोठे ठसे उमटत असतात .
वृत्तपत्रात आलेली बातमी खोटी नसणार अशी विश्वासार्हता अजूनही महाराष्ट्रात टिकून आहे आणि त्या मागे टिळक आगरकर,अत्रे खाडिलकर इत्यादी दिग्गजांनी आपली सचोटी आणि पुण्याई उभी केली आहे.
महाराष्ट्रीय पत्रकारिता विकाऊ नाही ह्याचे शेकड्यांनी दाखले मिळत असतात.सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचे एक अंगभूत कर्तव्य मरठी भूमीत अजूनही चोख पाणे पार पडले जाते.
वृत्तपत्र लोकशाहीचा एक महत्वाचा आधारभूत स्तंभ समाजाला जातो .,आणि पत्रकारांचे काम जागल्याचे असते ,समाजातल्या दुष्प्रवृत्तीनवर लक्ष्य ठेवणे आणि वेळीच त्याचा पद फास्श करणे हे त्यांचे एक कर्तव्य .
पण समाज जीवनात साहित्याचे ,कलांचे झरे वाहत राहायलाच हवे समाज जीवन सुखद होण्यासाठी संपन्न होण्यासाठी ह्या अंगांचीही जरुरी आहे ,साहित्य नाट्यकला चित्रपट कविता अवांतर लेखन सारख्या दालनाची दाखल अंदाजी घेणे आणि त्या दलानाशी समन्वय साधणे हेही हाडाच्या पत्रकाराचे गुण आहेत. शुष्कता नव्हे तर शोधक सर्जनशीलता ,आणि संवेदन शीलता हे पत्रकारितेची अष्टांगे ,पत्रकार केवळ बातमीदारच नव्हे तर सामालोचाकाही असायला पाहिजे.
चिन्मय पाटणकर म.टा.पुण्याचा उपसंपादक
एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व ,तरुण रसिक कवी आणि लेखकही ,प्रतिबिंब नावाचा त्याचा एक ब्लोग आहे त्या ब्लोग आरचे त्याचे स्फुट लेखन खरोखर अभिनंदनीय ,सोपी सरळ तरुणाईला भावेल अशी तरल भाषा ,विषयांची विविधता ,अभ्यासू समालोचन आणि वाचकांशी साधलेला सहज संवाद हि ह्याच्या लेखनाची वैशिष्टे पण तरीवी त्यामागून डोकावणारी पत्रकारिता .
अभ्यासपूर्ण लेखन ,विषयाची पूर्ण तयारी आणि नेमक्या शब्दांचे वापर हा त्याचा लेखंगून खरोखर जाणवत असतो .
नाटक आणि चित्रपट हे याच्या विशेष आवडीचे विषय.आणि त्यासाठी त्याची लेखणी तलवारीची धार घेते.नाट्यगृहांच्या दुर्गातीचे यतार्थ वर्णन करणारा "त्याचा कोणी नाट्यगृह देता का नाट्यगृह हा लेख वास्तवाचे कोरडे संबधितांच्या पाठीवर ओढणारा आहे.
चिन्मयच्या वालवर निवडुंगाचा फोटो आहे हिरवागार आणि कांटेरी "भालेतरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू"म्हणून बजावणारा आणि हि कंटक शल्ये तोक्दारच आहे म्हणून सांगणारा .ह्या निव्दुन्गाला मैत्रायानाचे सलाम.
शशांक रांगणेकर.
९८२१४५८६०२