Tuesday, May 22, 2012

मुले युद्धावर गेली कि आई वडलांना काय वाटते


रात्र दिवसा आम्हा युद्धाचा प्रसंग ,ह्याचा अनुभव दिवसेंदिवस येतोय ,आम्ह्ही खरोखरच सुखाशी भांडतोय ,दुक्खाशी भांडायचे दिवस दूर गेले आहेत.आता भांडतोय सुखाशी ,
इमारतीचे मजले उंच उंच होताहेत आणि शिस्त ,आणि सावधानी ह्याचीपातळी  मात्र खालावते आहे ,"चालता हैं सब कूच चालता हैं "हि बेफिकिरी मात्र आमच्या समाजाला पोखरते आहे ,,
१९ तारखेला मी आणि माझी पत्नी बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे सभागृहात WE4 समूहाने सादर केलेल्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.आजचे रविकिरण मंडळ आपल्या कवितांचे सादरीकरण कसे करेल ह्या बद्दल एक मनात उत्सुकता होती.
प्रेक्षागृहाच्या तळ मजल्याशी पोहताच कळले कि लिफ्ट चालत नाही आहे त्यामुळे गिर्यारोहण करूनच प्रेक्षागृहात प्रवेशावे लागले मनात एक विचार आला नो पेन नि गेन "
सभागृहाच्या बाहेर सुहास्य वदनाने उभ्या असलेल्या ललना निमंत्रीताना गजरे आणि चाफ्याची फुले देत होत्या ,काव्यवाचन किती सुगंधी होईल ह्याची एक झुळूकच होती ती .वातानुकुल यंत्रणा बंद असल्यानी भासणारा उष्मा प्रेक्षकांच्या उत्साहाने सुसह्य वाटत होता एकंदरीत उष्मा सुसह्य होता ,पण काम काळ वेगाचे गणित हे असतेच ,कार्यक्रमाला एवढा वेळ का लागतोय ह्याचे कारण कळले तेव्हा मात्र पाया खालची जमीनच हादरल्या सारखी वाटली ,"मंदार आणि समीर असे दोन कलाकार बंद लिफ्ट मध्ये इतर सहप्रवाश्या बरोबर अडकले आहेत त्यांना लिफ्ट मधून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशी बातमी कानावर आली .
प्रेक्षागृहात अस्वस्ताथा पसरली होती गजरे सुकू लागले होते आणि चाफा जणू बोलेनाच झाला होता .आमची दोन तरुण मुले संकटात अडकली होती ,आमची असहायता आम्हाला उभी जळत होती ,मराठी साहित्य आणि कला क्षेत्रांशी संबंधित बराचश्या व्यक्ती तिथे उपस्थित होत्या ,प्रेक्षागृहाचे कर्मचारी आपल्या प्रयत्नाची शर्थ करीत होते साधारण अर्धा ते पाऊन तास आपत्कालीन परिस्तिथी शी आमची दोन मुले झगडत होती ,"सतत कानात पराभवाच्या दोन ओळी एकू येत होत्या "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा "परदुख शीतल असते म्हणतात पण संवेदिनशील मनाला ते कधीही शीतल नसते .आणि इथे तर आमच्या मुलांना होणारा त्रासाच आम्हाला भेडसावत होता.हताशपणे वांझ सूचना उपसुचानाच्या भडिमारात अवघा प्रेक्षक विव्हळत होता .मी आणि पत्नी एकमेकाच्या जवळच उभे होतो आणि नकळत दोघांचेही हात एकमेकांना घट्ट धरत होते एका अनामिक भीतीने,कळात होते कि जीवन आणि मृत्यूचा मधले अंतर किती लहान आहे ते केवळ एका लिफ्ट च्या जाळी एवढे.
तगमग ह्या शब्दाचा नेमका अर्थ जाणवतच नव्हता तर जाळत हि होता. . आपत्कालीन यंत्रणा पूर्णतः काही वेळ ठप्पझाली होती.
परमेश्वर दयाळू आहे ह्याची खात्री त्यांनीच पटवून दिली आणि कोणाच्याका कोंबड्याच्या ओरडण्याने पहाट झाली आणि लिफ्ट मधली माणसे सुखरूप बाहेर आली कार्यक्रमाला सुरवात झाली .आनंदी आनंद झाला कार्यक्रम छान रंगला पण मनातली भयाची छटा मात्र पुंसली जात नव्हती ,मनात परत परत विचार येत होता लिफ्ट आणि काही वेळ चालू झाली नसती तर ,मन चिंती ते वैरी चिंती म्हणतात हेच खरे झाली होती. जीवन आणि मृत्यू काही श्वासांच्या अंतरावर पाठशिवणीचा खेळ खेळत होते. युद्धावर गेलेल्या मुलांच्या आई वडिलांना काय वाटत असेल त्याचा अनुभव क्षण भर पुरता का होईना आम्हाला आला.

ह्या सर्व घटनांना जवाबदार कोण उत्तर आम्ही स्वतःच ,आमची बेफिकीर वृत्ती ,सब चलता हैं असे म्हणणारी पराभूत मानसिकता ,मला काय त्याचे असे समजणारी गेंड्याची कातडी.
आमची सार्वजनिक नाट्य गृहे आणि त्यांची सुरक्षितता हा प्रश्न्या परत एकदा ऐरणीवर आला आहे ,आपत्कालीन यंत्रणा तिथे काम करते आहे कि नाही हे पाहण्याचे उत्तरदायित्व कोणाचे हे तपासण्याची वेळ आलेली आहे,जर हे असेच चालत राहिले तर बळजबरीचे हौतात्म्य निरपराधांच्या माथी मारले जाईल.
महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली बरचशी सार्वजनिक उपक्रम आहेत त्या ची सुरक्षितता हि महापालिकेची नैतिक जवबदारी आहे ,शिवसेनेच्या हातात बाळासाहेबांनी भगवा झेंडा दिला आहे आणि तो फडकतो आहे एका काठीवर ती काठी वेळप्रसंगी नाठाळाच्या माथी हाणण्यासाठी आहे.
we चार ह्या मराठी कार्यक्रमाला उडालेले आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे नक्कीच डोळ्यात अंजन घालणारे होते ,त्यामुळे झालेले नुकसान भरून देणे हि महापालिकेची कायदेशीर असेल नसेल पात नैतिक जवाबदारी जरूर आहे,ह्या पापाचे परिमार्जन हा कार्यक्रम महापालिकेने निशुल्क प्रायोजित करून करावे.आणि हे शासक आपले उत्तरदायित्व जाणतात ह्याचे उदाहरण घालून द्यावे.
शशांक रांगणेकर

1 comment:

प्रसाद चव्हाण said...

काका आगदी खरे आपले म्हणणे..
हा घडलेले प्रसंग नक्कीच आपली महापालिकेच्या व्यवस्थांचे धिंडवडे काढणारा होता...

पण त्या पेक्षा हि विचार करायला लावणारे आहे हे, नाही म्हणायला प्रसंग तसा बाकाच होता....
पण लढाई वर गेलेल्या सैनिकांच्या आई-वडिलांना प्रत्येक क्षणी काय वाटत असेल हे खरच त्यांना आणि फक्त त्यांनाच माहिती...
आपण त्याचा १ पट देखील विचार करू शकत नाही...

प्रसाद चव्हाण