Friday, May 18, 2012

we 4


  1. गुंतता हृदय हे .
    मराठी कविता हे मराठी मनाचे जागेपणीचे स्वप्न,ह्या स्वप्नाला अनेकांनी रंग रूप दिले आहेत ,ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत ,मोरोपंतांपासून,बा.सी.मर्ढेकर पर्यंत .अनंत फंदी पासून शाहीर पठ्ठे बापूराव पर्यंत ,सर्वांनी ह्या स्वप्नाला गहिरे रंग दिले आहेत.
    काव्यगायन हा मराठी संस्कृतीत कार्येक्रमातला एक अविभाज्य सोहळा असायचा आणि अजूनही तो शाबूत आहे.आपणच रचलेल्या कविता आपल्याच सुरेल आवाजात गायच्या हा रवी किरण मंडळ ह्या काही तरुण कवींच्या समूहाने आपल्या कवितांनी आणि काव्य गायनाने उभा महाराष्ट्र गाजवला होता .
    कुसुमाग्रजांची कविता,केशवसुतांची तुतारी,यमक्या वामनाची केकावली ,अनंत फंदी चे फटके ,आचार्य अत्रांची झेन्डूंची फुले , बालकवींची फुलराणी ,माधव जुलीयानाची ,भा रा तांबे ची नववधू,भटांची गझल हे मराठी कवितेच्या रस्त्या वरचे मैलाचे दगड ,ह्या अनंत शब्द शक्तीच्या जादूगारांनी मराठी कवितेला स्वरांच्या आणि सुरांच्या गोफात गुंफून रसिकांच्या समोर पेश केले.
    मराठी कविते बरोबर मराठी मन सुसंस्कृत आणि संपन्न करण्याचे काम ह्या कवी जनांनी केले. मराठी संस्कृतीच्या जडण घडणीत मराठी कविता आणि कवी जनांचा सिंहाचा वाटा कोणीही नाकारू शकत नाही.
    ह्या सर्व पुण्यःवाचानी नावाचे पाठबळ पाठीशी घेऊन एक नवीन रवी किरण मंडळ उदयाला आले .

    आहे "we चार "ह्या नावाखाली .
    २५ ते तीस ह्या वयोगटातले हे तरुण मराठी कवितेला आणि काव्यागायानाला नव संजीवनी देण्याचे काम करताहेत ,
    कौतुक करायला शब्द अपुरे पडावे अशी ह्यांची आशयघन कविता ,श्रावणातल्या पावसासारखी अंगावर बरसते आणि मनाचा कोपरान कोपरा भिजवते .
    प्राजक्त देशमुख ह्या चार तरुण कवितले एक सुगंधी व्यक्तिमत्व ,मातीत रुजलेली ह्याची कविता उन्हा पावसाशी नाते ठेवते आणि शेतकऱ्याचे दुखः तरल शब्दात चित्रित करते ,मृद्गान्धाशी ओळख सांगत फुलणारी ह्याची कविता रसिकाला चातका प्रमाणे हा दुसरी कविता कधी ऐकवेल ह्याची वाट बघायला लावते ,
    मंदार चोळकर "परीकथेतील राजकुमारा"अशी साद घालावी असे वाटणारे रसरशीत उमदे रूप आणि त्याबरोबर तरल आरस्पानी शब्दांची ईश्वर दत्त देणगी घेऊन आलेले एक मोहक व्यक्तिमत्व .पावसा तुला आता बरसून गेले पाहिजे म्हणून सांगतो तेव्हा वाटते काय बिशाद आहे पावसाची न बरसण्याची ,मंदारने सांगितले तर पाउस कधी हि बरसेल ,त्याच्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी.
    "मकरंद सावंत"ह्या चौघातले एक चिरंतन प्रेमाच्या रमल खुणांचेशब्द मोहर फुलवणारे मोहाचे झाड ,ह्याच्या शब्द शब्दात तिचे वर्णन बहरत असते ,ह्याचे शब्द म्हणजे प्रेमिकेने घेत्तलेली एक नाजूक अंगडाई .
    चौथे नावं "समीर सावंत "मराठी कवितेला यावनी लवंग लातिकेच्या रुपात घेऊन येणारी ह्याची कविता दक्ख्हन पासून दुअबा पर्यंत सहज पोहचते हिंदी आणि उर्दुशीही हितगुज करते.
    मनाला एक जागेपणी एक स्वप्न पडते ह्या चौघांचा एक कार्यक्रम चालू आहे मराठी तरुणाई ह्यांच्या सुरांवर शब्दांवर आणि स्वरांवर नागासारखी डोलते आहे ,आणि रविकिरण मंडळाचे सदस्य कवी ह्यांना आशीर्वाद देताहेत आणि म्हणताहेत "ह्याच साठी केला होता अट्टाहास "
    मराठी तरुणाईच्या ह्या अर्वाचीन रवी किरण मंडळाला मैत्रायानाच्या अगणित शुभेच्छा
    शशांक रांगणेकर
    मुंबई ९८२१४५८६०२

No comments: